'हीरामंडी द डायमंड बाजार' ही वेब सीरिज नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजचे संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केले आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोयराला, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरी, शरमिन सहगल, संजीदा शेख, शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा शाह आणि फरदीन खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या सीरिजची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'सजा हम जिस्म को नहीं रुह को देते है', 'सिर्फ घुंघरु पहनने से औरत तवायफ नही बनती, दिन और रात के सारे हुनर सीखने पडते है', 'मोहब्बत और बगावत के बीच कोई लकीर नही होती, इश्क और इंकलाब के बीच कोई फर्क नही होता' हे काही हीरामंडी वेब सीरिजमधील हिट झालेले डायलॉग आहेत. संजय लीला भन्साळी यांची ड्रीम प्रोजेक्ट असलेली ही सीरिज या डायलॉग वरुन कशी आहे याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. या सीरिजचे आठ एपिसोड प्रदर्शित झाले आहेत.
वाचा: सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत
हीरामंडी सीरिजच्या पहिला एपिसोडमध्ये सगळ्यांचा परिचय करुन देण्यात आला आहे. पण हा भाग थोडा कळण्यास किचकट जातो. पण दुसऱ्या भागापासून सीरिजमध्ये नेमके काय सुरु आहे हे कळायला सुरुवात होते. संजय लीला भन्साळी म्हटले की भव्य दिव्य सेट, झगमगाट हा आलाच. तसेच हीरामंडीमध्ये देखील आलिशान सेट, कलाकारांचे उर्दू भाषेतील डायलॉग, परिधान केलेले कपडे आणि सुंदर अभिनेत्री एकंदरीत पाहाताना मजा येते.
वाचा: चित्रपट पाहण्याचा विचार करत आहात? मग हे दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतात
सीरिजची सुरुवात ही हीरामंडी बाजारातील सर्वात मोठ्या रिहाना बेगम पासून होते. ही भूमिका अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने साकारली आहे. रिहानाची सुंदरता पाहून हीरामंडी बाजारातील लोक दिवसा स्वप्ने पाहात असतात. तिची शिस्तप्रियता, वागणे, बोलणे सर्वकाही लक्ष वेधी आहे. पुढे जाऊन रिहानाची जागा मल्लिकाजान म्हणजेच मनीषा कोयराला घेते. कहानीमध्ये इतका मोठा ट्विस्ट कसा आला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सीरिज पाहावी लागणार आहे. आई, बहिण, मुलगी या सगळ्यानात्यावर मल्लिकाजान पाणी सोडते. सीरिजच्या प्रत्येक पात्रामध्ये काही तरी खासियत आहे. तसेच या हीरामंडीच्या बाजारात सतत नवाब येताना दिसतात. नवाब जुल्फिकरची भूमिका शेखर सुमनने साकारली आहे. तर नवाब वली मोहम्मदच्या भूमिकेत फरदीन खान दिसत आहे.
वाचा: कार्तिकने घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यास दिला नकार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असणार सागरचे पुढचे पाऊल
हीरामंडीची कथा ही दोन वेश्यांमधील युद्धासारखी वाटते. एकाच कुटुंबातील दोन वेश्या या आपापले कुटुंबीय घेऊन आणि बाजारातील इतर वेश्यांना घेऊन आपला माहौला तयार करतात. एका आईच्या मनात मुलीसाठी कोणतीच भावना राहिलेली नाही. एक निर्दयी आई मल्लिकाजान जी आपल्या मुलींना कोठीची शान बनवू इच्छिते तर बहिणींना घरातील नोकराणी. सीरिजमधील काही सीन्स पाहून तुम्हाला मल्लिकाजानचा प्रचंड राग येईल. पण हिच हीरामंडीची खासियत आहे की द्वेष आहे पण निष्ठाही तेवढीच आहे. या निष्ठेमुळेच मल्लिकाजानचे वागणे देखील त्यांना आनंद देऊन जातो.
हीरामंडीची खासियत म्हणजे संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन, डायलॉग आणि दमदार परफॉर्मन्स. सीरिजमधील प्रत्येक पात्राला वेगवेगळी कथा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सीरिजमध्ये असलेल्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आवडती अभिनेत्री कोणती हे ठरवणे प्रेक्षकांना कठीण होऊन जाईल. सीरिजमधील उर्दू भाषेचा वापर ही जमेची बाजू ठरत आहे. सिनेमाटोग्राफी, बॅकग्राऊंड म्यूझिक, पंजाबी भाषा बोलणारे शाही नोकर, आलिशान घरे, संगीत आणि सीरिजचा शेवटचा सीन अंगावर शहारे आणणार आहे.
संबंधित बातम्या