मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ओटीटीवर दिसणार ‘हीरामंडी’चं विश्व; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संजय लीला भन्साळींची सीरिज

ओटीटीवर दिसणार ‘हीरामंडी’चं विश्व; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संजय लीला भन्साळींची सीरिज

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 28, 2024 10:54 AM IST

नुकतीच मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे'हीरामंडी: द डायमंड बझार'च्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली.

ओटीटीवर दिसणार ‘हीरामंडी’चं विश्व; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संजय लीला भन्साळींची सीरिज
ओटीटीवर दिसणार ‘हीरामंडी’चं विश्व; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संजय लीला भन्साळींची सीरिज

आपल्या बिग बजेट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. त्यांच्या मल्टीस्टारर वेब सीरिज'हीरामंडी: द डायमंड बाजार'ची रिलीज डेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. नुकतीच मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे'हीरामंडी: द डायमंड बझार'च्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली. संजय लीला भन्साळी यांची ही बहुप्रतीक्षित वेब सीरिज १ मे २०२४पासूनओटीटीप्लॅटफॉर्मनेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने आयोजित केलेल्या या नेत्रदीपक कार्यक्रमात अदिती राव हैदरी वगळता'हीरामंडी'ची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. संजय लीला भन्साळी यांच्यासह'हीरामंडी' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल आणि नेटफ्लिक्स इंडिया सीरिजच्या दिग्दर्शिका तान्या बामी यांनी'हीरामंडी'च्या रिलीजची तारीख जाहीर केली. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रधार सचिन कुंभार यांनी आदिती राव हैदरीच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा देताना सांगितले की, लग्नामुळे आदिती या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही.

‘बिग बॉस मराठी’च्या अभिनेत्यालाही ‘आशुतोष’च्या जाण्याचं दुःख! ‘आई कुठे काय करते’च्या ट्वीस्टवर म्हणाला...

संजय लीला भन्साळी नवीन प्रोजेक्टबद्दल उत्सुक!

आपल्या'हीरामंडी' या वेब सीरिजबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, ‘माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत मी अनेक मोठे चित्रपट केले आहेत. कारण, मला असे भव्य दिव्य चित्रपट करायला आवडतात. मी स्वतः या प्रक्रियेचा खूप आनंद घेतो. मी कधीच विचारपूर्वक मोठे चित्रपट केले नाहीत. मी फक्त कथा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मी'हीरामंडी'मधून ओटीटीच्या जगात प्रवेश करत आहे. मी इथेही थोडा पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. हीरामंडी हा माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. या सीरिजद्वारे काही खास अनुभव प्रेक्षकांसमोर मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे.

सई ताम्हणकरचं नशीब फळफळलं! एक नव्हे बॉलिवूडच्या ‘या’ दोन बिग बजेट चित्रपटात झळकणार

सर्वात महागडी सीरिज!

‘हीरामंडी’ हीओटीटी जगतातीलसर्वात महागडी सीरिज असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीरिजचे बजेट सुमारे २०० कोटी रुपये आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली'हीरामंडी: द डायमंड बाजार'ही वेब सीरिज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचे पोस्टर आणि स्टारकास्टचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर एक गाणे रिलीज झाले, ज्याने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली होती. आता'हीरामंडी'१ मे २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

WhatsApp channel

विभाग