मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  संजय दत्तने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, बहिणीसोबत शेअर केला फोटो
संजय दत्त
संजय दत्त (HT)
20 May 2022, 2:58 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 2:58 AM IST
  • संजय दत्तने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटातील संजय दत्तच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली होती. आता संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संजय दत्तने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दिसत आहे. त्यावेळी संजय दत्तसोबत त्याची बहिण देखील असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत संजय दत्तने, 'सिद्धिविनायकाचा आशिर्वाद घेण्यासाठी मी आणि प्रिया दत्त मंदिरात गेलो होतो' या अशयाचे कॅप्शन दिले आहे. संजय दत्तच्या या फोटोवर मान्यताने कमेंट केली आहे. तिने हार्ट इमोजी वापरले आहेत.

कामाविषयी बोलायचे झाले तर संजय दत्त लवकरच 'पृथ्वीराज' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook