Bollywood Kissa Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी अनुराग कश्यप आणि नीरज बोहरा यांच्यासोबत स्वत:चा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. इतकंच काय तर, या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि उर्वरित टीमने लोकांना चित्रपट पाहण्यासाठी न जाण्याचे आवाहन केले होते. परंतु, असे असूनही लोक चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. आपण हा चित्रपट पूर्ण करू शकलो नाही, यांची खंत संजय गुप्ता यांच्या मनात होती. म्हणून त्यांनी जनतेला स्वत:चा चित्रपट पाहण्यास नाही म्हटले होते. खुद्द संजय गुप्ता यांनी आपल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती.
या चित्रपटाविषयी बोलताना संजय गुप्ता यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'हा चित्रपट 'जंग' होता, त्याचे निर्माते सतीश टंडन होते. ज्यांनी आयुष्यात एकच चित्रपट बनवला. चित्रपट अपूर्ण होता, म्हणून मी जाऊन त्यांना भेटलो आणि म्हणालो की, सतीशजी गाणी करायची आहेत, पुढे दक्षिण आफ्रिकेच्या शूटची योजना आखायची आहे. यावर ते म्हणाले की, संजयजी, मी दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही, तुम्ही जे लिहायचे ते माझ्याकडून लिहून घ्या. लिंकिंग रोड ते फिल्म सिटी दरम्यान उर्वरित काम करा. तिथेच तुमचे शूटिंग करा.'
संजय दत्त अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले की, ‘मी त्यांना सांगितले की, सर एक काम करूया की, उर्वरित शूटिंग आधी पूर्ण करूया. गाण्यांचं काय करायचे ते नंतर पाहू. त्यानंतर त्यांनी चित्रपट पाहिला आणि म्हणाले की, चित्रपट पूर्ण झाला आहे, आता शूटिंग करण्याची गरज नाही. मी त्यांना बोललो की, तुम्ही वेडे तर झाला नाहीत नया? चित्रपटासाठी एक पटकथा, रचना, दृश्ये लागतात. सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की, संजय दत्तच्या बंगल्याबाहेर चित्रपट दिग्दर्शक, चित्रपटाचा नायक, चित्रपटाचे लेखक (अनुराग कश्यप आणि त्याचा भाऊ अभिनव कश्यप) आणि नीरज व्होरा यांच्यासह आम्ही सर्वांनी पत्रकार परिषद घेतली.’
संजय गुप्ता म्हणाले की, ‘आम्ही लोकांना सांगितले की, कृपया हा चित्रपट पाहू नका कारण हा चित्रपट अपूर्ण आहे. आम्ही सर्वांनी मिळून तो चित्रपट सोडला आणि हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला.’ या चित्रपटात संजय दत्त अतिशय मस्क्युलर अवतारात दिसला होता आणि त्याचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता. जॅकी श्रॉफ, आदित्य पांचोली, रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. चित्रपटाची कथा एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची आहे, ज्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाचा जीव वाचवायचा आहे, नंतर त्याच्या लक्षात येते की, तुरुंगात असलेला गुन्हेगारच आपल्या मुलाचा जीव वाचवू शकतो.
संबंधित बातम्या