Sanjay Dutt Birthday: खरंच संजय दत्त याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या? एकीसाठी तर त्याने आजारी पत्नीकडेही केलं दुर्लक्ष!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt Birthday: खरंच संजय दत्त याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या? एकीसाठी तर त्याने आजारी पत्नीकडेही केलं दुर्लक्ष!

Sanjay Dutt Birthday: खरंच संजय दत्त याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या? एकीसाठी तर त्याने आजारी पत्नीकडेही केलं दुर्लक्ष!

Jul 29, 2024 07:41 AM IST

Sanjay Dutt Birthday: त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, चित्रपटाच्या पडद्यावर आल्यावर त्याने नेहमीच खळबळ उडवून दिली. हा अभिनेता आहे बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त. आज संजय दत्त याचा ६५वा वाढदिवस आहे.

खरंच संजय दत्त याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या?
खरंच संजय दत्त याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या?

Happy Birthday Sanjay Dutt: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आज (२९ जुलै) त्याचा ६५वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या संजय दत्त याला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. आई आणि वडील दोघेही कलाकार असल्याने, त्याच्यातही कलाकारी उतरली होती. मात्र, त्याचं वैयक्तिक आयुष्य अजिबात सोपं नव्हतं. त्याच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्या आजही खूप चर्चेत असतात. त्यापैकीच एक म्हणजे संजय दत्त याला ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या. आजही संजूबाबाची ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आहे. पण, खरंच अभिनेत्याच्या इतक्या मैत्रिणी होत्या का? चला जाणून घेऊया...

१९८१मध्ये ‘रॉकी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या संजय दत्तने आतापर्यंत १८७हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये नायकपासून ते खलनायकापर्यंतच्या पात्रांचा समावेश आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, संजय दत्तच्या ३०८ गर्लफ्रेंड होत्या. ही गोष्ट खरी आहे. संजय दत्तच्या जीवनावर ‘संजू’ नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात त्याने स्वतः ३०८ मुलींसोबत अफेअर असल्याची कबुली दिली आहे.

Varsha Usgaonkar: एकेकाळी टॉपलेस फोटोमुळे खळबळ माजवणाऱ्या वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात

एकाच वेळी तीन मुलींशी प्रेमसंबंध!

संजय दत्तच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा त्याचं एकाच वेळी तीन मुलींसोबत अफेअर होतं. खुद्द संजय दत्तने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, तो एकाच वेळी तीन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण, तो कधीच पकडला गेला नाही. संजय दत्त याने स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा स्वतः केला आहे.

प्रेयसीसाठी आजारी पत्नीकडे केलं दुर्लक्ष!

संजय दत्तने १९८७मध्ये रिचा शर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच रिचाला ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले होते. यावरील उपचारासाठी ती अमेरिकेला गेली होती. यादरम्यान संजय दत्त देखील बॉलिवूडमध्ये व्यस्त झाला होता. असे म्हटले जाते की, १९९१मध्ये साजन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या खूप जवळ आले होते. जेव्हा, संजय आणि माधुरीच्या अफेअरची बातमी रिचापर्यंत पोहोचली, तेव्हा ती उपचार सोडून भारतात आली. त्यावेळी संजय दत्त रिचाला घेण्यासाठी विमानतळावरही गेला नव्हता. या प्रकरणाची चर्चा अनेक वर्ष रंगली होती.

Whats_app_banner