मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मनोज जरांगे पाटील’ गाताहेत छत्रपती शिवरायांची आरती! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील गाण्याची झलक बघाच!

‘मनोज जरांगे पाटील’ गाताहेत छत्रपती शिवरायांची आरती! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील गाण्याची झलक बघाच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 16, 2024 01:29 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आपण ऐकली आहेत. यातच आता संघर्ष योद्धा या चित्रपटातील ‘जयदेव शिवराया’ या गाण्याची भर पडणार आहे.

‘मनोज जरांगे पाटील’ गाताहेत छत्रपती शिवरायांची आरती! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील गाण्याची झलक बघाच!
‘मनोज जरांगे पाटील’ गाताहेत छत्रपती शिवरायांची आरती! ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील गाण्याची झलक बघाच!

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा दैवत. आजवर महाराजांवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. महाराजांचा इतिहास सांगणारे पोवाडे आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात. मात्र आता नव्याने रिलीज होणाऱ्या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आपण ऐकली आहेत. यातच आता संघर्ष योद्धा या चित्रपटातील ‘जयदेव शिवराया’ या गाण्याची भर पडणार आहे. आजवर पोवाडे तर अनेक ऐकले, मात्र महाराजांची आरती पहिल्यांदाच प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या गाण्यामुळे शिवप्रेमींचा उत्साह चांगलाच वाढला आहे. ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातील ‘जयदेव शिवराया’ या गाण्याला दमदार गायक आदर्श शिंदे यांचा आवाज लाभला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘जयदेव शिवराया’ हे गाणं ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतीच या गाण्याची झलक रिलीज झाली आहे. ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका साकारणारा अभिनेता ‘जयदेव शिवराया’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गाताना दिसला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील शिवरायांची आरती गाणार, असं म्हणत सगळे चाहते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत. शिवाजी दौलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, सोनई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेने या चित्रपटाच्या निर्मितीसह लेखनाचे कामही सांभाळला आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट का सोडला? रणदीप हुड्डाचं नाव घेत महेश मांजरेकर यांनी सांगितलं खरं कारण!

मातब्बर कलाकारांची फौज!

‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील यांना मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका साकारली आहे. यासोबतच या चित्रपटात अनेक दिग्गज आणि मातब्बर कलाकार देखील झळकणार आहेत. अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, मोहन जोशी, संजय कुलकर्णी, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे यांच्या सोबतच अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

लीलाला पूर्ण करावंच लागणार अभिरामला दिलेलं वचन! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार रंजक वळण

शिवरायांची आरती ठरणार आकर्षण बिंदू!

अवघ्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं भगवं वादळ आणणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पायाला भिंगरी लावून मनोज जरांगे पाटील अवघ्या महाराष्ट्रात फिरले. त्यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात ‘उधळीन जीव’, ‘मर्द मावळा शिवरायांचा वाघ’ अशी काही गाणी देखील पाहायला मिळणार आहेत. मात्र, शिवरायांची ही आरती या चित्रपटाचा आकर्षण बिंदू ठरणार आहे. आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं या गाण्याला एक वेगळं वलय मिळालं आहे. येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

IPL_Entry_Point