मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  संदीप पाठक याची पुरस्कारांची हॅटट्रिक; म्हणाला, पुरस्कारांचे श्रेय…
Sandeep Pathak
Sandeep Pathak
13 June 2022, 18:18 ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
13 June 2022, 18:18 IST
  • 'राख' या चित्रपटासाठी अभिनेता संदीप पाठक यानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे सलग तीन पुरस्कार पटकावले आहेत.

जागतिक कीर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२' (Couch Film Festival Spring 2022 ) मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारा चतुरस्र अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak Best Actor Award) याची यशस्वी घोडदैाड सुरूच आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव २०२२’ मध्येही याच चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसंच, ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२२’ या महोत्सवातही पुरस्कार पटकवत त्यानं हॅटट्रिक साधली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिका देखील चपखलपणे साकारणाऱ्या संदीप पाठक यानं मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे. तीन लोकप्रिय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यानं आनंद व्यक्त केला आहे.

'यंदाचं वर्ष माझ्यासाठी खास आहे. कौतुकाची थाप माझा आनंद व हुरूप वाढवणारी आहे. हा माझा एकट्याचा पुरस्कार नसून आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची ही मेहनत आहे. मला भविष्यातही अनेक उत्तम चित्रपट करायचे आहेत. एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांना जे आवडेल, ते देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. लवकरच माझे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यातील विविधांगी भूमिका सुद्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील, असा विश्वास संदीप पाठक यानं व्यक्त केला आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग