Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान सलमान हा पहिल्यापासूनच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. आता सलमान खानची एक्सगर्लफ्रेंड सोमी अलीने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सोमी ही सलमान खान सोबत असलेल्या नात्याविषयी नेहमीच बोलताना दिसते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सोमीने सांगितले की, सलमानने संगीता बिजलानीसोबतचे लग्न तिच्यामुळे तोडले होते. हे ऐकून सर्वांना धक्का बसला.
सोमी अलीने टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'संगीताने मला आणि सलमानला रंगेहात पकडले होते. संगीता आत आली तेव्हा मी आणि सलमान माझ्या खोलीत बोलत होतो. ती सलमानकडे बघत राहिली आणि म्हणाली तुला आमच्या दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल. सलमानने मला सांगितले की सोमी मी १० मिनिटांत परत येतो. मला वाटले की तो संगीताबरोबर सर्व काही ठीक करेल आणि तिच्याशी लग्न करेल. कारण त्यांच्या लग्नाचे कार्ड छापले होते. पण तो परत माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की त्याने संगीतासोबत ब्रेकअप केले आहे. त्याला माझ्यासोबत रहायाचे होते.'
सोमीने पुढे सांगितले की, अनेक वर्षांनंतर त्याने संगीताची माफीही मागितली आणि दोघांमध्ये एकमेकांबद्दल काहीही चुकीच्या भावना नाहीत असे देखील म्हटले. "मी तिची मनापासून माफी मागतो असे तो म्हणाला होता. तेव्हा मी लहान होतो आणि मी काय करतो आहे हे मला माहित नव्हते. त्याने मला सांगितले की मला काही फरक पडत नाही. अझरसोबत लग्न केल्याचा मला आनंद आहे, पण दुसऱ्याच महिन्यात तिने अझरला घटस्फोट देखील दिला. मला माहित आहे की १६ वर्षीय सोमी अलीने जे केले ते चुकीचे होते.'
वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
सोमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान तिचा क्रश आहे. बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आणि सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी ती मुंबईत आली होती. रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि सोमी यांनी १९९० मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. बुलंद या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आहे