Sana Khan Second Baby : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बिग बॉस ६'ची स्पर्धक सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. सना आणि तिचा पती अनस सय्यद यांनी त्यांच्या मुलाच्या आगमनानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. सनाने तिच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर ही माहिती दिली. सना आणि अनस आधीपासूनच एका मुलाचे, सय्यद तारिक जमीलचे पालक आहेत. आता त्यांनी आणखी एका मुलाचे स्वागत केले आहे.
सना खान हिने तिच्या मुलाच्या जन्माची घोषणा करणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोमवारी सना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर केली आहे. सना आणि अनस सय्यद यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म ५ जानेवारी २०२५ रोजी झाला. जुलै २०२३ मध्ये या जोडप्याच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच मुलगा तारिक जमीलचा जन्म झाला होता. याशिवाय सनाने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये तिच्या गरोदरपणाबद्दलही सांगितले. अरबाज खानची पत्नी शूरा खानने सनाच्या या पोस्टवर हृदयाच्या इमोजीसह अलहमदुलिल्लाह लिहिले.
सना खानने २०२०मध्ये फिल्म इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते. याआधी ती अनेक चित्रपट आणि शोमध्ये दिसली होती. सना खान आणि मुफ्ती अनस सय्यद यांचा २१ नोव्हेंबर २०२० रोजी सूरतमध्ये विवाह झाला होता. सना खान 'बिग बॉस ६'मध्ये झळकली होती आणि या शोमध्ये ती दुसरी रनर अप ठरली होती. याशिवाय तिने 'हल्ला बोल', 'जय हो', 'आवाज तुम हो' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'बिग बॉस ६'व्यतिरिक्त, सना खानने 'झलक दिखला जा ७', 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ६'सारख्या अनेक रिॲलिटी शोमध्ये देखील काम केले आहे.
नेहमी मॉडर्न आणि वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणारी सना खानने आता तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. अभिनेत्री आता फक्त आबाया आणि बुरखा परिधान करताना दिसत आहे. अभिनेत्री डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली असते. तिच्या चेहऱ्याशिवाय शरीराचा दुसरा कोणताही भाग दिसत नाही. ती अनेकवेळा हज आणि उमराह करण्यासाठी जाते. सध्या अभिनेत्री अभिनय सोडून केवळ आपल्या मुलांवर आणि संसारावर लक्ष केंद्रित करत आहे. लग्नानंतर तिने मनोरंजन विश्वातून काढत पाय घेतला.
संबंधित बातम्या