मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अक्षयमुळे ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप ठरला; निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

अक्षयमुळे ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप ठरला; निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 22, 2022 03:06 PM IST

अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी आता मोठा खुलासा केला आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार (HT)

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट २०२२मधील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये होते. त्यामुळे चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटाने १०० कोटी देखील कमाई केलेली नाही. आता निर्मात्यांनी चित्रपट फ्लॉप ठरण्यामागचे कारण सांगितले आहे.

एका वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सम्राट पृथ्वीराज फ्लॉप ठरल्यामुळे निर्माते आदित्य चोप्रा नाराज आहेत. त्यांनी चित्रपट अक्षय कुमारमुळे फ्लॉप ठरला असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेशभाई जोरदार नंतर सम्राट पृथ्वीराज हा यशराज बॅनरचा दुसरा फ्लॉप चित्रपट आहे.
आणखी वाचा : ‘पृथ्वीराज’साठी अक्षय कुमारने घेतले तगडे मानधन, जाणून बसेल धक्का

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट फ्लॉप ठरण्यास अक्षय कुमार कारणीभूत असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. सम्राट चित्रपटासाठी अक्षय कुमारने फार मेहनत घेतली नाही. त्याने खरी मिशी देखील ठेवली नाही. या चित्रपटासोबतच तो दुसऱ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. जेव्हा तुम्ही एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असता तेव्हा इतर प्रोजेक्टपेक्षा या प्रोजेक्टकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते. पण अक्षयने असे केले नाही. अक्षयने त्याचे १०० टक्के दिलेले नाहीत. इतकच काय तर फिल्म आर्किटेक्ट देखील सम्राट पृथ्वीराजसाठी अक्षय कुमारला दोषी ठरवत आहेत.

‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसली. यासोबतच चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकले. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. तसेच हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

WhatsApp channel

विभाग