मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gautami Patil: संभाजीराजेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा, आडनावावरील वादावर म्हणाले…

Gautami Patil: संभाजीराजेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा, आडनावावरील वादावर म्हणाले…

Aarti Vilas Borade HT Marathi
May 29, 2023 02:42 PM IST

Sambhaji Raje: संभाजी राजेंनी नुकत्याच एका कार्यक्रमात महिलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे वक्तव्य केले आहे.

Gautami Patil
Gautami Patil

राज्यभरात तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या व मार्केट जाम करणारी लावणी डान्सर म्हणजे गौतमी पाटील. तिच्या कातिला अदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या सर्वत्र गौतमीची चर्चा करत आहेत. नुकताच गौतमीच्या अडनावावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रतिक्रिया देत गौतमीला पाठिंबा दिला आहे.

गौतमीने पाटील हे आडनाव काढावे का या विषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व सर्वांना दाखविले आहे. सात वर्ष ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला तेव्हापासून महिला सबलीकरण सुरू झाले आहे आणि शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिला आहे. कलाकरांना संरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मी आहे."

काय आहे नेमका वाद?

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. राजेंद्र जराड पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा ईशा दिला. त्यावर गौतमीने “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असे बेधडक उत्तर दिले. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग