Samay Raina Controversial Show : ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडवरून झालेल्या गदारोळानंतर हा वादग्रस्त भाग युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. युट्यूबर पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा हे दोघे समय रैनाच्या या कॉमेडी शोमध्ये दिसले होते. या शोमध्ये दोघांनी जी काही वक्तव्य केली, त्यावर बरीच टीका झाली होती. भारत सरकारच्या आदेशानंतर आता युट्यूबने तो एपिसोड ब्लॉक केला आहे.
कॉमेडियन समय रैनाचा कॉमेडी शो ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाच्या आई-वडिलांवर केलेल्या अश्लील कमेंटने खळबळ उडवून दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवरून हा वादग्रस्त व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली आहे. रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट्सचा समावेश असलेला ‘इंडियाज गॉट लॅटेंट’चा एपिसोड भारत सरकारच्या आदेशानुसार युट्यूबवरून ब्लॉक करण्यात आला आहे.
कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण या व्हिडिओला अश्लील म्हणत सगळेच हा एपिसोड ब्लॉक करण्याची मागणी करत होते. त्याचबरोबर आता या शोवर बंदी घालण्याची ही मागणी होत आहे. या वादग्रस्त प्रकरणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रोल झाल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने लोकांची माफी देखील मागितली आहे. रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा आणि आशिष चंचलानी यांच्याविरोधात मुंबई आणि गुवाहाटीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय झालं?
रणवीर अलाहाबादिया समय रैनाच्या शोमध्ये जज म्हणून आला होता. यादरम्यान, त्याने एका स्पर्धकाला विचारले की, ‘तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पहायचे आहे का की, एकदा त्यांच्यासोबत सामील होऊन ते कायमचे थांबवायचे आहे?’ हा व्हिडिओ प्रदर्शित होताच रणवीरचे हे वक्तव्य आणि हा शो व शोमधील सर्व जजसह हे विधान वादाचा विषय बनले.
या विधानानंतर, मुंबई पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली, ज्यामध्ये या व्हिडिओत अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वाद वाढल्यानंतर, रणवीरने त्याच्या विधानाबद्दल माफी मागितली, परंतु त्याच्याविरुद्ध पोलिस खटला अजूनही सुरू आहे.
संबंधित बातम्या