Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी नागा आणि शोभिता यांनी पारंपरिक रीतीरिवाजानुसार लग्न केले. कुटुंबाव्यतिरिक्त त्यांचे अनेक खास मित्रही या लग्नात सहभागी झाले होते. या लग्नाचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर युजर्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच आता नागा चैतन्यची एक्स वाइफ आणि अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे दिसत आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नानंतर सामंथा रूथ प्रभूने गुरुवारी सकाळी तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ही स्टोरी एक एक नॉस्टॅल्जिया आहे. सामंथाने इन्स्टाग्रामवर 'सिटाडेल' टीमसोबत चित्रपटाच्या सेटवर घालवलेल्या आठवणींना उजाळा देणारी आहे. 'सिटाडेल : हनी बनी'चे दिग्दर्शक रुसो ब्रदर्सची एक पोस्ट तिने शेअर केली आहे. ही पोस्ट पुन्हा शेअर करत समांथाने, 'काय प्रवास होता... अविश्वसनीय राज डीके सोबत सिटाडेल : हनी बन्नी मध्ये काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे' असे लिहिले आहे.
सामंथा रूथ आणि नागा चैतन्य यांनी २०१७मध्ये लग्न केले होते. त्यांचे लग्न खूप चर्चेत होते. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या दोघांना इंडस्ट्रीचे पॉवर कपल मानले जायचे. पण त्यानंतर असं काही घडले की चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काही वर्षांनी म्हणजे २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर सामंथाने कामातून ब्रेक घेतला आणि आता ती आपले आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. 'सिटाडेल हनी बनी' या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली आहे.
वाचा: बॉलिवूडमधील 'हा' सिनेमा आहे छोटा राजनच्या जीवनावर आधारित? संजय दत्तने साकारली होती भूमिका
गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. काल ४ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पाडण्यात आला. नागा चैतन्यचे वडील नागार्जुनने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या