नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Aug 08, 2024 11:42 PM IST

Samantha Ruth Prabhu: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाल यांच्या साखरपुड्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

नागा चैतन्य, शोभिता धुलिपाला आणि सामंथा रुथ प्रभू
नागा चैतन्य, शोभिता धुलिपाला आणि सामंथा रुथ प्रभू

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा झाला आहे. नाग चैतन्यचे वडील, साऊथ स्टार नागार्जुन यांनी या खास सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर साखरपुड्याची माहिती दिली आहे. त्यानंतर काही वेळातच नागा चैतन्यची पूर्व पत्नी अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने एक पोस्ट शेअर केली आहे. आता ही पोस्ट काय आहे चला पाहूया...

काय आहे समांथाची पोस्ट?

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर काही तासांनी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टच्या माध्यमातून तिने नागा चैतन्यच्या साखरपुड्यावर थेट भाष्य केलेले नाही. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे समांथाने या पोस्टच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. भारतीय हॉकी संघाने गुरुवारी स्पेनचा २-१ असा पराभव करत ब्राँझपदक पटकावले. अशातच सामंथाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "भारताच्या हॉकी हिरोंनी स्पेनवर शानदार विजय मिळवत कांस्यपदक जिंकले! चक दे इंडिया। '

सामंथा रुथ प्रभु
सामंथा रुथ प्रभु

नागार्जुनने मुलाच्या साखरपुड्याचा केला फोटो शेअर

नागार्जुनने मुलाच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सुखी जोडप्याचे अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंद मिळो, अशी शुभेच्छा. देव आशीर्वाद दे! ८.८.८ अनंत प्रेमाची सुरुवात.’

नागार्जुनची पत्नी अमला अक्किनेनी आणि चैतन्यचा भाऊ अखिल हा साखरपुडा समारंभात धुलिपालाच्या आई-वडिलांसोबत उपस्थित होता, अशी माहिती चैतन्य याच्या जवळच्या सूत्रांनी दिली. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स या उच्चभ्रू ठिकाणी नागार्जुन आणि कुटुंबीय एका आलिशान घरात राहतात. तेलुगू चित्रपट चाहत्यांसाठी हे घर मैलाचा दगड आहे.

समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नागाच्या 'दुसऱ्या लग्ना'च्या अफवा समोर आल्या होत्या. यापूर्वी त्याने सामंथा रूथ प्रभू यांच्याशी लग्न केले होते. २०२१ मध्ये ते विभक्त झाले होते. २०१७मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. परंतु, त्यांचे नाते काही वर्षेच टिकले. २०२१मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. शोभितासोबतच्या आणि नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. तर, समंथाचे चाहते संतापलेले दिसले आहेत. समंथा आणि नागाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दरम्यान ते प्रेमात पडले होते. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडायची. मात्र, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांना धक्का दिला होता.

Whats_app_banner