Samantha Ruth Prabhu Father Passes Away : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. समांथाने ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. समंथाने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले की, ‘बाय बाबा! जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत…’ यासोबतच समंथाने एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी शेअर केला आहे.
वडील जोसेफ प्रभू यांच्या निधनाची माहिती स्वत: समंथा रुथ प्रभू हिने शेअर केली आहे. वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली असून, जोसेफ प्रभू यांनी या जगाचा निरोप घेतल्याची माहिती सर्वांना दिली आहे. हे सांगताना अभिनेत्रीचे मन दुःखाने भरून आले आहे. समंथा रुथ प्रभू यावेळी खूप दुःखात आहे आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. समंथा रुथ प्रभू तिच्या वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेली आहे.
काही काळापूर्वी समंथा रुथ प्रभूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने भावनिक करणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. अभिनेत्रीने लिहिले, 'जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही, तोपर्यंत बाबा....' यासोबतच सामंथाने एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी शेअर केला आहे. आता अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून चाहत्यांनाही तिची काळजी वाटू लागली आहे. सगळ्यांनाच समंथाची काळजी वाटत आहे. त्याचवेळी, समंथाचे वडील जोसेफ प्रभू यांचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही? मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
काही वेळापूर्वीच समंथा रुथ प्रभू सेलिब्रेशन करत होती. तिच्या ‘सिटाडेल : हनीबनी’ या वेब सीरिजची सक्सेस पार्टी २८ नोव्हेंबरला मुंबईत झाली. या सेलिब्रेशनमधून अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत. पण या आनंदाचे इतक्या लवकर शोकात रूपांतर होईल, असे कोणाला वाटले नसेल. आता बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील लोक अभिनेत्रीचे सांत्वन करत आहेत आणि तिच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
एकीकडे समंथाचा माजी पती नागा चैतन्य याच्या घरी हळदीची धूमधाम सुरू आहे. अभिनेता आता शोभिता धुलिपालासोबत लग्नबंधनात अडकत आहे. तर, दुसरीकडे समंथावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.