
Samantha Ruth Prabhu Emotional Post: आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता मनोरंजन विश्वातून ब्रेक घेणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अभिनेत्री समंथा सध्या मायोसिटीस नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. याच आजारावर उपचार घेण्यासाठी आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी समंथाने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या चर्चांना पूर्णविराम देत आता स्वतः अभिनेत्रीने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आगामी चित्रपटाचा शेवटचा शॉट पूर्ण केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे चाहते जगभरात आहेत. जेव्हापासून अभिनेत्रीने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समंथा दीर्घ विश्रांती घेत आहे. या निर्णयाने अभिनेत्रीची टीम देखील खूपच भावूक झाली आहे. समंथाने नुकतेच ‘सिटाडेल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. यावेळी तिने मेकर्सचे आभार मानत ही संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर, या पोस्टच्या शेवटला तिने, ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत...’ असे म्हटले आहे.
तर, समंथाचा जवळचा मित्र आणि तिचा हेअरस्टायलिस्ट रोहित भाटकर याने देखील तिच्यासाठी एक लांबलचक नोट लिहिली आहे. रोहितने समंथासाठी लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘२ वर्षे, १ सेन्सेशनल म्युझिक व्हिडीओ, ३ चित्रपट, ७ ब्रँड कॅम्पेन, २ संपादकीय आणि आयुष्यभर टिकतील अशा आठवणी... ऊन-पावसापासून, आनंदाश्रू आणि हास्यापासून ते दुःख आणि दुःखाच्या अश्रूंपर्यंत सर्व काही आपण एकत्र पाहिले आहे. किती सुंदर झाला हा प्रवास तुझ्यासोबत... आम्ही तुझ्या दमदार पुनरागमनाची वाट पाहू. पुढच्या वेळी परतून येईपर्यंत...खूप खूप प्रेम.’
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. समंथाला मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे तिला तिच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. याच कारणामुळे तिने तेलुगू चित्रपट ‘ख़ुशी’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर कामातून ब्रेक घेतला आहे.
संबंधित बातम्या
