मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samantha Ruth Prabhu: समंथा रूथ प्रभूचं दणक्यात पुनरागमन! ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला

Samantha Ruth Prabhu: समंथा रूथ प्रभूचं दणक्यात पुनरागमन! ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 12, 2024 01:37 PM IST

Samantha Ruth Prabhu Comeback: गेल्या वर्षी समंथा रुथ प्रभू हिला एका गंभीर आजाराचे निदान झाले. यातून सावरण्यासाठी तिने काही काळ ब्रेकही घेतला.

Samantha Ruth Prabhu Comeback
Samantha Ruth Prabhu Comeback

Samantha Ruth Prabhu Comeback: साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून मोठ्या ब्रेकवर आहे. अभिनेत्री एका मोठ्या आजाराशी झुंज देत असून, यातून बरे होण्यासाठी ती गेल्या काही महिन्यांपासून ब्रेक घेऊन उपचार घेत आहे. चाहते समंथाच्या पुनरागमनाची वाट बघत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. अभिनेत्री समंथा प्रभू आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच तिने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

समंथा रुथ प्रभू हिची हिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. केवळ साऊथच नाही, तर हिंदी प्रेक्षकांमध्येही समंथा खूप लोकप्रिय आहे. अभिनेता मनोज बाजपेयी याच्या 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधून समंथा बॉलिवूडमध्ये देखील लोकप्रिय झाली. या वेब सीरिजनंतरच तिला हिंदीतही लोकप्रियता मिळाली. मात्र, एकीकडे कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना २०२३ हे वर्ष मात्र अभिनेत्रीसाठी खूप संघर्षाचे ठरले. गेल्या वर्षी समंथा रुथ प्रभू हिला एका गंभीर आजाराचे निदान झाले. यातून सावरण्यासाठी तिने काही काळ ब्रेकही घेतला. पण, आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या पुनरागमनाची जोरदार तयारी करत आहे.

Prajakta Mali: धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजन; प्राजक्ता माळी सुरू करणार ‘भिशी मित्र मंडळ’!

समंथा चाहत्यांना देणार सरप्राईज!

समंथाचे चाहते बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीकडून तिच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आतुर झाले होते. आता स्वत: समंथाने तिच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. यासोबतच तिने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. समंथा रुथ प्रभू आता हेल्थ पॉडकास्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समंथा प्रभूने नुकतीच तिच्या या नव्या ‘हेल्थ पॉडकास्ट’ची घोषणा केली. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, ‘होय, मी पुनरागमन करत आहे. अनेकांना हा प्रश्न पडलेला की, मी पुनरागमन कधी करणार? त्या सगळ्यांच्याच प्रश्नाला माझं उत्तर... गेल्या काही काळापासून मी मोकळी होते आणि मला काही कामही नव्हते. त्यामुळे आता मी तुम्हा सगळ्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवण्याचा विचार केला आहे. नव्या हेल्थ पॉडकास्टमधून तुमच्या भेटीला येतेय.’

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू शेवट ‘खुशी' या चित्रपटात झळकली होती. तिचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही चांगले झाले होते. याशिवाय तिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता अभिनेत्री पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. २०२३मध्ये समंथा रूथ प्रभू हिने आपण ‘ऑटो-इम्यून डिसीज मायोसिटिस’ने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. तेव्हापासून समंथा ब्रेकवर होती. आता ती ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करत आहे.

WhatsApp channel

विभाग