मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: विमातळावर व्हिडीओ घेत असलेल्या चाहत्याला पाहून सलमान खान चिडला! हातवारे करत म्हणाला...

Viral Video: विमातळावर व्हिडीओ घेत असलेल्या चाहत्याला पाहून सलमान खान चिडला! हातवारे करत म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 08, 2024 03:01 PM IST

Salman Khan Viral Video: सध्या सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान चाहत्याला फटकारताना दिसला आहे.

Salman Khan Viral Video
Salman Khan Viral Video

Salman Khan Viral Video: बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान तसा नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत धमाल मस्ती करताना दिसतो. पण कधी कधी चाहत्यांच्या कृत्यांवर तो भयंकर चिडतो. कधी कधी अशा काही गोष्टी घडतात की, भाईजानच्या रागाचा पार चढतो. सलमान नेहमीच त्याच्या चाहत्यांना हसतमुखाने भेटतो. चाहत्यांशी गप्पा मारतो आणि सेल्फी फोटो देखील काढतो. मात्र, यावेळी काहीतरी विचित्रच घडले आहे. यावेळी सलमान खान त्याच्या चाहत्यावर चिडलेला पाहायला मिळाला आहे. सध्या सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान चाहत्याला फटकारताना दिसला आहे.

सलमान खान याचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ विमानतळावरचा आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान कुठून तरी येत असताना, त्याच्या आजूबाजूला सिक्युरिटी देखील दिसत आहेत. तर, सलमान खान याला विमानतळावर येत असताना एक चाहता थोडा लांब उभा राहून त्याचा व्हिडीओ बनवत असताना दिसत आहे. यावेळी सलमान त्याच्या टीमसोबत येताना दिसत आहे. यावेळी सलमान खान त्याच्या चाहत्याला सेल्फी आणि व्हिडीओ काढत असल्याचे पाहून ओरडताना दिसला आहे.

Shaitaan Movie Twitter Review: ‘शैतान’ प्रदर्शित होताच सोशल मीडियावरही कल्ला! चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणतायत...

सलमान खानला आला राग!

परवानगी न घेताच एक चाहता सेल्फी आणि व्हिडीओ काढत असल्याचे बघून सलमान खान त्याच्यावर चिडला आहे. यावेळी सलमान खान याने त्याच्या चाह्त्यावर ओरडून त्याला फोन बंद करण्यास सांगितले. तर, सलमान खानची टीम देखील चाहत्याला कॅमेरे बंद करण्यास सांगत आहे.

सलमानचे चाहते संतापले!

सलमान खान चाहत्याला ओरडत असतानाचा हा व्हिडीओ व्हायरल होत असताना आता या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आपला राग व्यक्त करत आहेत. काही लोक सलमान खानवर टीका करत आहेत. ‘बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना फॉलो करणे थांबवा’, ‘त्यांना भाव देऊ नका’, ‘भाऊ तुझा अपमान होत होता का?’, ‘एका फोटो व्हिडीओने इतकं काय होणार होतं? अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. मात्र, काही लोक सलमान खानची बाजू घेत आहेत. कलाकारांच्या प्रायव्हसीचीही काळजी घेतली पाहिजे, असे प्रत्येकजण म्हणत आहे.

अभिनेता सलमान खान नुकताच जामनगरहून मुंबईला परतला आहे. सलमान खान, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी जामनगरला गेला होता.

IPL_Entry_Point