Viral Video : सोशल मीडियावर ज्ञान देणाऱ्यांची सलमाननं काढली सालटी, तरुणाईला दिला मोलाचा सल्ला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : सोशल मीडियावर ज्ञान देणाऱ्यांची सलमाननं काढली सालटी, तरुणाईला दिला मोलाचा सल्ला

Viral Video : सोशल मीडियावर ज्ञान देणाऱ्यांची सलमाननं काढली सालटी, तरुणाईला दिला मोलाचा सल्ला

Published Feb 10, 2025 12:58 PM IST

Salman Khan Video : बॉलिवूडचा 'दबंग' अर्थात अभिनेता सलमान खान याने अशा लोकांचे चांगलेच कान टोचले आहेत. सलमान खानने तरुणाईला देखील मोलाचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियावर ज्ञान देणाऱ्यांची सलमाननं काढली सालटी,तरुणाईला दिलेला सल्ला प्रत्येकानं ऐकलाच हवा!
सोशल मीडियावर ज्ञान देणाऱ्यांची सलमाननं काढली सालटी,तरुणाईला दिलेला सल्ला प्रत्येकानं ऐकलाच हवा!

Salman Khan Viral Video : सध्याची तरुण पिढी ही इतकी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती या माध्यमातून व्यक्त करते.सोशल मीडिया हा अन्न, वस्त्र आणि निवारा यानंतरचा आवश्यक घटक बनू लागला आहे. या माध्यमाचा लोकांवर इतका प्रभाव आहे की, आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी या माध्यमातून पडताळून पहिल्या जातात आणि इथे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लोक सहज विश्वास ठेवतात. याचीच संधी साधून आता अनेक लोक स्वयंघोषित मोटीव्हेशनल स्पीकर बनले असून, यामुळे अनेकांवर चुकीचा प्रभाव देखील पडत आहे. आता बॉलिवूडचा 'दबंग' अर्थात अभिनेता सलमान खान याने अशा लोकांचे चांगलेच कान टोचले आहेत. सलमान खानने तरुणाईला देखील मोलाचा सल्ला दिला आहे.

सलमान खान हा त्याच्या बिनधास्त बोलांमुळे चांगलाच लोकप्रिय आहे. सलमान अनेकदा त्याला न पटणाऱ्या गोष्टींवर सडेतोड बोलणं पसंत करतो. नुकताच सलमान खान याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान, मलायका आणि अरबाज यांचा मुलगा अरहान याच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये मुलाखत देताना दिसत आहे.

कोणी धोका दिला, हे कधीच सांगू नका.. पॉडकास्टमध्ये सलमान खानने आयुष्य आणि मैत्रीवर केली 'मन की बात'

काय म्हणाला सलमान खान?

या वेळी सलमान खान म्हणतो की, ‘आजकाल कुणी उठतं आणि सोशल मीडियावार ज्ञान पाजळू लागतं. त्यामुळे तरुणाईला देखील वाटतं की हे आपल्यासाठी आहे. अरे पण हे तुमच्यासाठी आहे हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि जे लोक सांगत आहेत की, हे तुमच्यासाठी आहे, त्यांनी कसं ठरवलं की हे तुमच्यासाठी योग्य आहे. कुणी येत आणि सांगतं की, तुम्ही नोकरीसाठी नाही तर उद्योग विश्वासाठी बनला आहात. अरे असं प्रत्येकासाठी नसेल ना! कुणीतरी नसेल बिझनेससाठी बनलं, कदाचित नोकरीच करणंच योग्य असेल.’

चाहत्यांनी केलं सलमान खानचं केलं कौतुक!

सलमान खान पुढे म्हणाला की, 'तुमच्यासाठी काय योग्य आहे हे दुसरं कुणी कसं ठरवू शकतं? हे जे लोक सगळं बोलतात हे बोगस आहे.' या व्हिडिओमधून सलमान खान अशा स्वयंघोषित सेल्फ मोटीव्हेशनल स्पीकर्सवर चांगलाच संतापला आहे. त्याने यातून तरुणाईचे कान देखील टोचले आहेत. सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तर, चाहते त्याच्या या बोलण्याचं कौतुक देखील करत आहेत.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner