Viral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्...

Viral Video : चक्क काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरला सलमान खान, चाहत्यांनी पाहिले अन्...

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 22, 2025 07:21 PM IST

Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान चक्क टॅक्सीमधून उतरताना दिसत आहे.

salman khan sikandar
salman khan sikandar

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान सूत्रसंचालन करत असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस १८'ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोनंतर सलमान आपला सगळा वेळ सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये घालवत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान निळ्या रंगाचा शर्ट घालून टॅक्सीतून उतरून एका वस्तीमध्ये जाताना दिसत आहे. त्याच्यासोबत काही लोक देखील दिसत आहेत. आता हा नेमका कुठला व्हिडीओ आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान निळ्या रंगाचा शर्ट घालून एका काळ्या-पिवळ्या टॅक्सीमधून उतरताना दिसत आहे. तसेच तो टॅक्सीमधून उतरून एका वस्तीमध्ये जातो. तेथे त्याच्यासोबत काही लोक देखील असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. जेव्हा इतर लोक त्याला टॅक्सीमधून उतरताना पाहातात तेव्हा त्याच्या भोवती जमा होतात.

काय आहे व्हिडीओ मागचे सत्य?

सलमान खानचा आगामी सिनेमा सिंकदरच्या सेटवरील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते अभिनेत्याचे कौतुक करत आहेत आणि त्याला नवीन भूमिकेत पाहण्याची वाट पाहत आहेत. सलमानच्या करिअरसाठी सिकंदर हा मोठा चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खानचे गजनी निर्माते एआर मुरुगदास यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि रश्मिकाची जोडी पडद्यावर काय करते हे पाहणे मजेदार असेल. यंदा ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
वाचा: 'हिना खानचा कॅन्सर प्रवास हा पीआरने प्लान केला होता', अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

गेल्या काही वर्षांत सलमान खानला एकही ब्लॉकबस्टर चित्रपट देता आलेला नाही. राधे, किसी का भाई किसी की जान आणि टायगर 3 सारखे अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दबंग खान करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत सिकंदर सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमानचा खास मित्र साजिद नाडियाडवाला करत आहे.

Whats_app_banner