Salman Khan Sikandar Teaser : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी म्हणजेच भाईजानच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. यासाठी चाहते खूप उत्सुक होते, पण आता त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाच्या दु:खात चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असून, चाहत्यांना थोडे थांबण्यास आणि समजून घेण्यास सांगितले आहे. आता हा टीझर पुढे कोणत्या दिवशी रिलीज होणार हेही निर्मात्यांनी सांगितले आहे.
चित्रपटाचे प्रॉडक्शन हाऊस नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटने सोशल मीडियावर पोस्ट केले की, ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाने आम्हाला खूप दु:ख झाले आहे आणि म्हणूनच सिकंदरच्या टीझरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देताना आम्हाला खेद होत आहे. आता २८ डिसेंबरला सकाळी ११.०७ वाजता हा टीझर रिलीज होणार आहे.’ निर्मात्यांनी पुढे लिहिले की, ‘या दुःखद काळात आमच्या संवेदना संपूर्ण देशासोबत आहे. आपण आम्हाला समजून घ्याल अशी अपेक्षा... धन्यवाद.’
एका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान खानला घालावे लागले होते ५-६ लेडीज लेगिंग्ज! वाचा भन्नाट किस्सा‘सिकंदर’ या चित्रपटाचा टीझर सलमान खानच्या वाढदिवसाला रिलीज करण्याची योजना आखण्यात आली होती. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी एक दिवस अगोदर २६ डिसेंबरच्या संध्याकाळी ‘सिकंदर’ चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लुक शेअर करून चाहत्यांची आतुरता वाढवण्याचे काम केले होते. तर, आज २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.०७ वाजता हा टीझर येणार असल्याने, चाहते आतुर झाले होते. मात्र, दुर्दैवाने माजी पंतप्रधानांच्या निधनाने देशाला मोठा धक्का बसला आहे. माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहताना, ‘सिकंदर’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना आणखी एक दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे.
गुरुवारी संध्याकाळी निर्मात्यांनी आणि खुद्द सलमानने शुक्रवारी सलमानच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर रिलीज होणार असल्याची घोषणा केली होती. ‘सिकंदर’चे दिग्दर्शन एआर मुरुगादास करत आहेत. मुरुगादास हे अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते म्हणाले की, हा चित्रपट अॅक्शनने परिपूर्ण असेल आणि त्याचबरोबर यात सामाजिक संदेशही देण्यात येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
साजिद नाडियादवालाच्या आगामी मॅग्नम ऑपस फिल्म 'सिकंदर'चे फर्स्ट लूक पोस्टर आधीच रिलीज झाले आहे. हे पोस्टर अत्यंत नेत्रदीपक आणि संस्मरणीय आहे. साजिद नाडियादवाला आणि ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित, 'सिकंदर' सिनेमा असा असेल जो ॲक्शन, ड्रामा आणि भावनांचे परिपूर्ण मिश्रण दाखवेल.
संबंधित बातम्या