छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' ओळखला जातो. सध्या बिग बॉसचे १७वे पर्व सुरु असून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. हा शो दिवसेंदिवस रंगत चालला आहे. स्पर्धकांची नोकझोक, तसेच घरातून त्यांची एग्झिट या सगळ्यामुळे शो चर्चेचा विषय ठरत आहे. आता शोमधून 'तहलका' उर्फ युट्यूबर सनी आर्याचा घरातील प्रवास संपला आहे.
बिग बॉसच्या घरात नेहमी विकेंडचा एखाद्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात येते. मात्र, सनीने अभिषेकसोबत केलेल्या भांडणानंतर बिग बॉसने त्याला घरातून बाहेर काढले आहे. त्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला घरातून बाहेर काढण्यात आले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तहलका अभिषेकचं टी-शर्ट खेचताना दिसत आहे.
वाचा: 'रंधावा पॅरेडाईज'मध्ये घडला मोठा गुन्हा; गोळी झाडून एका व्यक्तीची हत्या
ईशा मालवीय दिवसा झोपलेली असते. त्यामुळे अरुण तिला उठवताना दिसतो. दरम्यान अभिषेकला त्याची सांगण्याची पद्धत चुकीची वाटते. सनीदेखील या मुद्द्यावर त्याचे मत मांडतो. सनी आणि अरुण हे एकमेकांचे खास मित्र असून ते अभिषेकसोबत भांडतात. तहलका अभिषेकला अरुणपासून दूर राहण्यास सांगतो. तसेच त्याचे शर्टदेखील खेच खेचत अपशब्दांचा वापर करतो. तहलकाच्या या वागण्याने 'बिग बॉस'ने त्याला घरातून बाहेर काढले आहे. आता सनी परत घरात येणार की त्याला कायमचे काढून टाकण्यात आले आहे. हे आजच्या भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या