Loveyapa Screening Viral Video : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आमिरपाठोपाठ आता त्याचा मुलगा जुनैद खानही वडिलांच्या वाटेवर चालला आहे. 'महाराज'नंतर जुनैद आता त्याच्या 'लव्हयापा' या दुसऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर 'लव्हयापा'मध्ये जुनैदसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून 'लव्हयापा'चे स्क्रिनिंग सुरू आहे. जुनैद आणि खुशीचा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले होते, पण बॉलिवूडचे दोन खान अवतरले तेव्हा सर्वांच्या नजरा खिळल्या.
आमिरच्या मुलाच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला शाहरुख खान आणि सलमान खान उपस्थित होते. यामुळे सर्वांच्या नजरा सलमानच्या जीन्सकडे गेल्या. त्याच्या जीन्सवर काहीतरी लिहिलं होतं, ज्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सलमान खानने हजेरी लावली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमिर आपल्या मुलाच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानचा शो ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला होता. या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश झाले होते. यावेळी सलमानचा स्वॅग पाहायला मिळाला. भाईजानच्या जीन्सनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या जीन्सवर काहीतरी लिहिलं होतं, ज्याची आता चर्चा सुरू आहे.
सलमानच्या जीन्सवर लिहिलं होतं- ‘लव्ह नाऊ क्राय लेटर ...’ अर्थात आता प्रेम, नंतर रडू. यावर चाहत्यांच्या कमेंट्सही येत आहेत. यावेळी सलमान खूप खुश दिसत होता आणि त्याने आमिरच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली. सलमान आणि आमिरला पाहून लोकांना 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट आठवला. बिग बॉसदरम्यान आमिरने 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलबद्दलही भाष्य केलं होतं. अशापरिस्थितीत चाहत्यांना त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा आहे.
आमिरचा मुलगा जुनैदच्या 'लव्हयापा' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही शाहरुख खान ने हजेरी लावली होती. शाहरुख येताच आमिरने धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याचवेळी शाहरुखने आमिरसोबत त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक केला.
खुशी कपूर आणि जुनैद खान यांच्या 'लव्हयापा' या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. आशुतोष राणादेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 'लव्हयापा'पूर्वी खुशी नेटफ्लिक्सच्या 'द आर्चीज' या चित्रपटात झळकली होती. खुशीने या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
संबंधित बातम्या