Salman Khan Bodyguard Shera: सलमान खान कुठेही गेला तरी त्याच्यासोबत सावलीसारखी त्याच्या मागे असणारा दुसरा व्यक्ती म्हणजे त्याचा बॉडीगार्ड शेरा. १९९५पासून शेरा सलमान खानचे संरक्षण करत आहे. चित्रपटाचा सेट असो वा अवॉर्ड फंक्शन किंवा एखादी पार्टी, शेरा नेहमीच सलमान खानसोबत दिसतो. गेल्या २९ वर्षांपासून शेरा प्रत्येक सुख-दु:खात सलमान खानच्या पाठीशी उभा राहिला आहे. शेराही आता सलमान खानच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहे. सलमान खान लक्झरी लाईफ जगत असताना शेराची लाईफस्टाईलही आता तशीच आलिशान झाली आहे. सलमान खानसोबत त्याचा हा बॉडीगार्डही चर्चेत असतो. शेराने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, तो शेवटच्या श्वासापर्यंत सलमान खानसोबत राहणार आहे. शेरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तो त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे.
सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘देवाच्या कृपेने आम्ही कुटुंबातील आणखी एका सदस्याचे स्वागत केले आहे.’ शेराने रेंज रोव्हर स्पोर्ट ही लक्झरी कार खरेदी केली आहे. या फोटोत तो त्याच्या नवीन कारसोबत पोज देताना दिसला आहे. शेराही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.
सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने खरेदी केलेल्या कारची किंमत १.४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आता इतकी महागडी कार खरेदी करणं शेरासाठी काही कठीण नाही. त्याचा महिन्याचा पगार लाखात आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोक त्यांचे चांगले मित्र आहेत. शेराचे खरे नाव गुरमीत सिंग जॉली आहे. तो शेरा या नावाने ओळखला जातो. १९९५पासून शेरा सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी घेत आहे. यासोबतच तो टायगर सिक्युरिटी नावाची फर्म चालवतो, जी सुरक्षा पुरवण्याचे काम करते. २०१७मध्ये तो गायक जस्टिन बीबरचा सुरक्षा रक्षकही होता. त्यावेळी जस्टिन मुंबईत परफॉर्म करण्यासाठी आला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेराचा मासिक पगार १५ लाख रुपये आहे. म्हणजेच तो एका वर्षात १ कोटी ८० लाख रुपये कमावतो. सलमानसोबतच त्याची कंपनी उच्च प्रोफाइल ग्राहकांना सुरक्षा प्रदान करते. यात केवळ बॉलिवूडच नाही तर, हॉलिवूड स्टार्सचाही समावेश आहे. पगार आणि सुरक्षा सेवा देणाऱ्या कंपनीबरोबरच तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कमाई करतो. इंस्टाग्रामवर त्याचे दहा लाख फॉलोअर्स आहेत. यासोबतच मासिके आणि वृत्तपत्रांमध्येही त्यांची छाप पडली आहे. आपल्या कामातून खूप नाव कमावले आहे.