बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. व्हॅलेंटाईन डेला हा फोटो शेअर करून त्याने आपल्या चाहत्यांची मने खूश केली आहेत. या फोटोत तो एकटा नाही. त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, ‘अग्निहोत्रियन्स, शर्मानियन्स और खानेनियन्स ’तुम्हा सर्वांना फॅमिली डेच्या खूप खूप शुभेच्छा.
चाहत्यांना सलमानची स्टाईल खूप आवडली. ते फोटोवर कमेंट करत त्यांचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, 'परफेक्ट फॅमिली'. तर एकाने लिहिले की, हम साथ साथ है. तिसऱ्याने लिहिलं, "भाऊ याला हिरो म्हणतात." तर काही जण सलमानला त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाचे अपडेट विचारत आहेत.
सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट यंदा ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. एआर मुरुगादॉस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अॅक्शन-थ्रिलर मध्ये रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटानंतर सलमान त्याच्या सर्वात मोठ्या फ्रँचायझी चित्रपट ‘किक’वर काम सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान ईदनंतर 'किक २'ची तयारी सुरू करेल. 'किक'प्रमाणेच 'किक २'मध्येही जॅकलिन फर्नांडिसही दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
संबंधित बातम्या