मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arbazz Khan Wedding: 'माझ्या भावानं जर माझं ऐकलं असतं तर....', अरबाजच्या लग्नावर सलमानची प्रतिक्रिया

Arbazz Khan Wedding: 'माझ्या भावानं जर माझं ऐकलं असतं तर....', अरबाजच्या लग्नावर सलमानची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2024 08:00 AM IST

Salman Khan Recation Arbazz Khan Wedding : काही दिवसांपूर्वी अभिनेता अरबाज खानने निकाह केला. त्याचे हे दुसरे लग्न आहे. आता अरबाजचा भाऊ अभिनेता सलमान खानने त्याच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

Salman Khan
Salman Khan

बॉलिवूडमध्ये खान कुटुंबीयांचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. मग तो शाहरुख खान असो वा सलमान खान. दोन्ही अभिनेत्यांचे कुटुंबीय हे कायमच लाइमलाइटमध्ये असतात. अभिनेता सलमान खान आणि त्याचे दोन्ही भाऊ देखील कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अरबाज खानने दुसरे लग्न केले. भावाच्या या दुसऱ्या लग्नावर आता सलमानने प्रतिक्रिया दिली आहे.

अरबाज खोनने जेव्हा दुसरे लग्न केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काही नेटकऱ्यांनी अरबाजला शुभेच्छा दिल्या तर काहींनी टीका केली होती. आता सलमानने अरबाजच्या लग्नावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरलो होतो; रणबीर कपूरने सांगितला किस्सा

नुकताच बिग बॉस १७ या रिअॅलिटी शोचा विजेता घोषित करण्यात आला. या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करताना दिसतो. त्यामुळे निर्मात्यांनी सलमामचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांना देखील ग्रँड फिनालेचे आमंत्रण दिले होते. यावेळी कॉमेडीयन भारती सिंह देखील तेथे उपस्थित होती. तिने सलमानला तुमचा भाऊ दुसरं लग्न करतो आहे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? असा सवाल करते. त्यावर सलमानने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सलमान म्हणतो की, मी तर त्याला म्हणालो होतो की, तू लग्न करतोय पण....यावेळी सलमानने घेतलेला पॉझ खूप काही सांगून जाणारा होता. त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांना हसू आनावर झाले. अरबाजनने देखील गमतीन त्याला हसून दाद दिल्याचे दिसून आले. भारतीने तुम्ही मला तुमच्या लग्नात का नाही बोलावले, तेव्हा अरबाजने आता नाही तर पुढच्या लग्नात नक्की बोलवू...असे म्हणून भारतीची समजूत काढली.

WhatsApp channel