मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू

Salman Khan: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 14, 2024 07:54 PM IST

Laapataa Ladies: सलमान खानने किरण राव निर्मित 'लापता लेडीज' या चित्रपटाशी संबंधीत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे.

‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू
‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू

Salman Khan on Praises Laapataa Ladies: बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान त्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे ज्याचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतात. तो इतर कलाकारांच्या चित्रपटाविषयी फार कमी वेळा बोलताना दिसतो. पण याला अपवाद एक चित्रपट ठरला आहे. नुकताच सलमान खानने किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' चित्रपटाची प्रशंसा केली आहे. सलमानने उचललेले पाऊल पाहून चाहत्यांनी प्रशंसा केली आहे.

सलमान खानने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' चित्रपट कसा वाटला हे सांगितला आहे. 'आताच किरण रावचा लापला लेडीज हा चित्रपट पाहिला. वाह किरण वाह... मी आणि माझ्या वडिलांनी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या या चित्रपटासाठी किरण तुला खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर काम. माझ्यासोबत कधी काम करणार?' या आशयाची पोस्ट सलमानने केली आहे. एकंदरीत सलमानने 'लापता लेडीज' चित्रपटाचा रिव्ह्यू दिला असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: 'दर दोन मिनिटाला मांड्या दाखवते', किरण खेर मलायका अरोरावर संतापल्या

लापता लेडीज चित्रपटाविषयी

तुम्हाला माहिती आहे का लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. तर किरण रावने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम रिव्ह्यू मिळाले होते. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. १३ दिवसांत चित्रपटाने केवळ ९.७९ कोटी रुपयांची कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लापता लेडीज या चित्रपटात नीतांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवी किशन, भास्कर झा, दुर्गेश कुमार आणि गीता अग्रवाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?

किरण रावच्या कामाविषयी

लापता लेडीज हा किरण रावच्या दिग्दर्शनातला पहिला चित्रपट नाही. २०१० साली प्रदर्शित झालेला 'धोबी घाट' हा चित्रपट तिरण रावने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नाही. त्यानंतर आता लापता लेडीजची चर्चा ऐकायला मिळत आहे.

सचिन तेंडुलकरने देखील केली प्रशंसा

काही दिवसांपूर्वी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने लापता लेडीज हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत किरण रावचे कौतुक केले होते.

IPL_Entry_Point

विभाग