बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी खास असतो. गेल्या काही दिवसांपासून 'टायगर ३' या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने किती कमाई केली आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
'टायगर ३' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सनी देओलच्या 'गदर २' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले. आता चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केलेल्या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे. १४ नोव्हेंबर रोजी चित्रपटाने ४२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत १४६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: सलमान खानचा 'टायगर ३' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे
पहिल्या दिवशी टायगर ३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५.५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५७.५० कोटी रुपयांचा गल्ला जमावला. तर तिसऱ्या दिवशी ४२.५० कोटी रुपये कमावले. चित्रपटाने एकूण १४६ कोटी रुपये कमावले. येत्या काही दिवसात चित्रपट आणखी कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पठाणने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ७०.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर टायगर ३ चित्रपटाने ५७.५० कोटी रुपयांची कमाई दुसऱ्या दिवशी केली आहे. जवान चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. गदर २ चित्रपटाने ४३.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. एकंदरीत सलमानच्या टायगर ३ने शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.
'टायगर ३' या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार देखील दिसत आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.
संबंधित बातम्या