
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आज पाचवा दिवस आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र विकेंड सोडल्यावर चित्रपटाने फारशी कमाई केली नसल्याचे आले आहे. प्रेक्षकांनी भाईजानच्या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दृश्य दिसत आहे.
सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट १०० कोटी रुपयांची कमाई करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र कमाईत घट होत असल्याचे दिसत आहे. पाचव्या दिवशी चित्रपटाने १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चला पाहूया चित्रपटाची एकूण कमाई.
वाचा: मराठी मालिकेचे शुटिंग परदेशात, शशांक केतकरने शेअर केला फोटो
'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाने चार दिवसात ७८.३४ कोटी रुपये कमावले आहेत. पाचव्या दिवसाची कमाई मिळून ८५.८४ कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमावला आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पहिल्या दिवशी- १५.८१ कोटी रुपये
दुसऱ्या दिवशी- २५.७५ कोटी रुपये
तिसऱ्या दिवशी- २६.६१ कोटी रुपये
चौथ्या दिवशी- १०.७१ कोटी रुपये
पाचव्या दिवशी- ७.५० कोटी रुपये
सलमान खानसोबत या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.
संबंधित बातम्या
