Salman Khan: भाईजान शब्दाचा पक्का! कॅन्सरवर मात करणाऱ्या ९ वर्षांच्या चाहत्याची घेतली भेट!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: भाईजान शब्दाचा पक्का! कॅन्सरवर मात करणाऱ्या ९ वर्षांच्या चाहत्याची घेतली भेट!

Salman Khan: भाईजान शब्दाचा पक्का! कॅन्सरवर मात करणाऱ्या ९ वर्षांच्या चाहत्याची घेतली भेट!

Jan 25, 2024 01:44 PM IST

Salman Khan Meet 9 Yr old Fan: अभिनेता सलमान खानने नुकतीच त्याच्या ९ वर्षीय चाहत्याची जगनबीरची भेट घेतली. सलमानच्या या चिमुकल्या चाहत्याने केमोथेरपीच्या ९ राऊंडनंतर कॅन्सरशी लढाई जिंकली आहे.

Salman Khan Meet 9 Yr old Fan
Salman Khan Meet 9 Yr old Fan

Salman Khan Meet 9 Yr old Fan: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान आपल्या शब्दाचा पक्का आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. इतका मोठा स्टार असून देखील सलमान खान आपल्या प्रत्येक चाहत्याची तितकीच काळजी घेतो. याशिवाय सलमान खान त्याच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. 'वॉन्टेड' चित्रपटातील त्याच्या डायलॉगप्रमाणेच सलमान खऱ्या आयुष्यातही आपली वचने पूर्ण करतो. सलमान खान नेहमीच आपल्या स्टाईलने लोकांची मने जिंकत असतो. आता पुन्हा एकदा त्याने असे काही केले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. सलमान खानने नुकतीच त्याच्या ९ वर्षाच्या चाहत्याची भेट घेतली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

अभिनेता सलमान खानने नुकतीच त्याच्या ९ वर्षीय चाहत्याची जगनबीरची भेट घेतली. सलमानच्या या चिमुकल्या चाहत्याने केमोथेरपीच्या ९ राऊंडनंतर कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. २०१८मध्ये सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भेटला होता. त्यावेळी ४ वर्षांच्या जगनबीरवर ट्यूमरसाठी केमोथेरपी सुरू होती. त्यादरम्यान सलमानने जगनबीरला वचन दिले होते की, जेव्हा तो कॅन्सरविरुद्धची लढाई जीकेल, तेव्हा सलमान खान त्याला पुन्हा भेटायला येईल.

Friend Request: एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने बदलेल का ‘त्या’ चौघांचे आयुष्य? अजय पुरकर यांच्या नाटकाने वाढवली उत्सुकता!

गेल्या वर्षी जगनबीरने कर्करोगावर यशस्वी मात करून, ही लढाई जिंकली आहे. यानंतर त्याने डिसेंबर २०२३मध्ये सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तर, सलमान खानने देखील जगनबीरच्या उपचारांच्या आव्हानात्मक काळात दिलेले वचन पूर्ण केले. मात्र, आता खूप दिवसांनी ही गोष्ट समोर आली आहे. त्यांचे हे जुने फोटो तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये सलमान खान हॉस्पिटलमध्ये जाऊन जगनबीरला भेटताना दिसला होता. हे फोटो पाहून आता चाहते सलमान खानचे खूप कौतुक करत आहेत.

या व्हायरल फोटोंवर एका चाहत्याने लिहिले की, 'सलमान खान हा रील नसून रिअल हिरो आहे.' तर एका चाहत्याने लिहिले, 'एक ही तो दिल है कितनी बार जितेगे सलमानभाई.' एका चाहत्याने लिहिले की, 'सलमान खानकडे खरंच सोन्याचे हृदय आहे.' सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या कमेंट्स दिसत आहेत. नेटकरी सलमान खान आणि त्याच्या या चिमुकल्या चाहत्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Whats_app_banner