मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: अंबानींच्या पार्टीत सलमानने अर्जुनकडे केले दुर्लक्ष, मलायका आहे कारण?

Salman Khan: अंबानींच्या पार्टीत सलमानने अर्जुनकडे केले दुर्लक्ष, मलायका आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 05, 2024 05:21 PM IST

Salman Khan ignore arjun kapoor: सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये सलमान अर्जुनकडे दुर्लक्ष करताना दिसतो.

Salman Khan ignore arjun kapoor
Salman Khan ignore arjun kapoor

Salman Khan Video from Anant Wedding: जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय विवाहपूर्व सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. या प्रीवेडिंग फंकशनला जगभरातील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांनी हजेरी लावली. जामनगरमध्ये पार पडलेल्या या फंकशनची जोरदार चर्चा सुरु आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अंबानींच्या प्रीवेडींग पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने चक्क अर्जुन कपूरकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळते.

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान हा अभिनेता रणवीर सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांची भेट घेताना दिसत आहे. मात्र यावेळी त्याने धोनीच्या बाजूलाच उभ्या असलेल्या अर्जुन कपूरकडे साफ दुर्लक्ष केले आहे. स्वत:हून सर्व कलाकारांशी संवाद साधणाऱ्या सलमानने अर्जुनकडे का दुर्लक्ष केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

अर्जुन कपूर हा अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत होता. मलायका ही सलमानचा भाऊ अरबाज खानची पूर्व पत्नी आहे. त्यामुळे सलमान आणि अर्जुन यांच्यातील संकोचलेपणा याठिकाणी दिसून आला. सलमानने अर्जुनकडे दुर्लक्ष केले तर अर्जुनने त्याची भेट घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यानेसुद्धा सलमानपासून दूरच राहणे पसंत केले. मात्र बाजूलाच उभ्या असलेल्या महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्याशी तो गप्पा मारत असतो. अर्जुन कपूर आणि सलमान यांच्यात आता मलायकामुळे शीतयुद्ध असलं तरी एकेकाळी अर्जुनला बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी सलमानने मोठी मदत केली होती.
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

अर्जुनने ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला हा पहिला चित्रपटमिळवून देण्यासाठी सलमान खानने मदत केली होती. बोनी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये अर्जुनला अभिनेता होण्याचा सल्ला सलमानने दिल्याचे सांगितले होते. एकेकाळी अर्जुन हा अर्पिता खानला देखील डेट करत होता.
वाचा: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्...; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

अनंत अंबानीची प्रीवेडिंगला कलाकारांची हजेरी

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंकशनमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये ‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिलिसाचा देखील समावेश आहे. बॉलिवूडमधून शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, किरण राव, जितेंद्र, करीना कपूर खान, सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीश्मा कपूर, रितेश देशमुख, जिनिलिया, दीपिका पादूकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली.

कधी होणार लग्न?

गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

WhatsApp channel