Bigg Boss 18 New Time : प्रेक्षकांचा आवडता आणि लोकप्रिय टीव्ही शो 'बिग बॉस १८'चा वेळ आता बदलणार आहे. कलर्स टीव्ही चॅनलवर येणाऱ्या टीव्ही शो आणि रिॲलिटी शोच्या वेळेत बदल करण्याबाबत नवे अपडेट समोर आले आहे. १६ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या आवडत्या शोची वेळ बदलत आहे. आता सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस १८'च्या वेळेबाबत एक नवी अपडेट आली आहे. आता आणखी दोन टीव्ही शो 'मंगल लक्ष्मी' आणि 'मेरा बालम ठाणेदार'च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
सलमान खानचा शो 'बिग बॉस १८' सुरू झाल्यापासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता टीव्हीवर प्रसारित होत आहे. मात्र,काल शोच्या वेळेत झालेल्या बदलाबाबत एक अपडेट समोर आले. १६ डिसेंबरपासून हा शो रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना आता त्यांचा आवडता 'बिग बॉस १८' पाहण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. 'बिग बॉस १८'च्या वेळेत बदल फक्त आठवड्याच्या दिवसांसाठी आहे. तर, 'वीकेंड का वार' फक्त शनिवार आणि रविवारी रात्री ९.३० वाजता टीव्हीवर प्रसारित केला जाईल. याशिवाय आणखी दोन टीव्ही शो 'मंगल लक्ष्मी' आणि 'मेरा बालम ठाणेदार'च्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
अभिनेत्री दीपिका सिंह स्टारर टीव्ही शो 'मंगल लक्ष्मी' रात्री ९ वाजता प्रसारित केला जाईल. परंतु, आता हा शो केवळ अर्धा तास नाही तर संपूर्ण तासभर तुमचे मनोरंजन करणार आहे. म्हणजेच १६ डिसेंबरपासून तुम्हाला तुमचा आवडता शो 'मंगल लक्ष्मी' सोमवार ते शुक्रवार रात्री ९ ते १० या वेळेत पाहता येणार आहे. तर 'मेरा बालम ठाणेदार' रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. या शोने 'बिग बॉस १८'ची जागा घेतली आहे.
निर्मात्यांनी या टीव्ही शोच्या वेळा का बदलल्या यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, 'बिग बॉस १८'चे चाहते यामुळे थोडे निराश होऊ शकतात. कारण आता हा शो अर्ध्या तासाच्या विलंबाने टीव्हीवर दाखवण्यात येईल.'बिग बॉस १८'मध्ये यापूर्वी देखील बदल झाले आहेत. यादरम्यान, 'वीकेंड का वार' शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवारी रात्री ९ वाजता दाखवला गेला होता. मात्र, आता बिग बॉस पुन्हा जुन्या वेळेवर आला आहे.
संबंधित बातम्या