Salman Khan Father purches new Car: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर लॉरेन्स अधिक चर्चेत आहे. दरम्यान, सलमानचे वडील सलीम खान यांनी धनतेरसला नवी कार खरेदी केली आहे. वडिलांच्या सुरक्षतेसाठी सलमानने ही कार खरेदी केली आहे की धनत्रयोदशी निमित्त होते याबाबत माहिती समोर आलेली नाही. या कारची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
सलीम खान यांची नवी पांढरी मर्सिडीज बेंझ जीएलएस कार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच गाडीला फुलांचा हार घालण्यात आला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानच्या नव्या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, "सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीला नवीन वाहन. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी नवीन मर्सिडीज खरेदी करून धनतेरस साजरी केली" असे कॅप्शन दिले आहे. सलिम खान यांनी स्वत:साठी मर्सिडीज कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत १.५७ कोटी रुपये आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानने बुलेट प्रूफ कारही खरेदी केली होती. त्यामुळे एका महिन्यात खान कुटुंबीयांनी दोन महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. सलमानला सतत बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमक्यांमुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी या कार खरेदी केल्या आहेत.
सलमानला नुकतीच आणखी एक धमकी मिळाली आहे. फोन करणारा नोएडाचा असून त्याचे वय २० वर्षे होते. याच व्यक्तीने जीशान सिद्दीकीला ही धमकी दिली होती. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पण त्याने धमकी का दिली याविषयी काही सांगितलेले नाही.
वाचा: दादा कोंडकेंच्या 'त्या' कृत्यामुळे ओशोंनी बोलावले होते भेटायला, वाचा नेमकं काय झालं होतं?
सलमानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तो सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमानचा कॅमिओ आहे. तो त्याच्या दबंग चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर तो सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच सलमानचे शाहरुखसोबत देखील काही सिनेमे येणार आहेत.
संबंधित बातम्या