Tiger 3: सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' सुरु असताना सिनेमा गृहात फटाक्यांची आतिषबाजी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tiger 3: सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' सुरु असताना सिनेमा गृहात फटाक्यांची आतिषबाजी

Tiger 3: सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' सुरु असताना सिनेमा गृहात फटाक्यांची आतिषबाजी

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 13, 2023 11:41 AM IST

firecrackers during Tiger 3 screening: सध्या सोशल मीडियावर टायगर ३ चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये थिएटरमध्येच फटाके फुटताना दिसत आहेत.

firecrackers during Tiger 3 screening
firecrackers during Tiger 3 screening

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'टायगर ३' हा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर काल १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटगृहामध्येच चाहत्यांनी चक्क फटाक्यांची आतिषबाजी केली आहे.

सलमानची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते. मालेगावमधील एका चित्रपटगृहात 'टायगर ३' चित्रपट सुरु असताना टवाळ खोराकडून हुल्लडबाजी करून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. ही घटना मोहन चित्रपटगृहामध्ये 'टायगर ३' या चित्रपटाचा रात्री ९ ते १२च्या शो दरम्यान घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: विद्याला किस करताना घाबरला होता इम्रान हाश्मी, जाणून घ्या काय नेमकं काय झालं

सलमानच्या अतिउत्साही चाहत्यांनी चित्रपट गृहात सुतळी बॉम्ब आणि इतर फटाके फोडून तुफान आतिषबाजी केली. टायगर ३ चित्रपट सुरू असताना जेव्हा सलमान खानची एन्ट्री होते तेव्हा या टवाळखोरांनी जोरदार आतिषबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा गोंधळ उडून पळापळ झाली होती. हूल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फटाके वाजवीताना चित्रपट गृहाला आग लागून मोठी दुर्घटना होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मालेगावमध्ये असे पहिल्यांदाच झालेले नाही. तेथील चित्रपटगृहांमध्ये अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.

'टायगर ३' या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार देखील दिसत आहेत. हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.

Whats_app_banner