गेल्या काही दिवसांपासून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. या अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या पुरुष निर्माते व दिग्दर्शक यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये मोठी उलथापालथ पाहाया मिळत आहे. आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने खळबळजनक खुलासा केला आहे.
अभिनेत्री सोमी अलीने बॉलिवूडबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने ९०च्या दशकात काही बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले. बॉलिवूडमध्ये काम करताना यादरम्यान तिने काही धक्कादायक गोष्टी अनुभवल्या ज्याचा तिने आता खुलासा केला आहे. सोमी अलीने अलिकडेच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की तिला एका मोठ्या निर्मात्याने सल्ला दिला होता जर करिअर चांगले करायचे असेल तर तुला तडजोड करावी लागेल.
सोमी अलीने नुकताच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'अनेक महिलांना दिग्गज अभिनेत्यांचा रुममधून पहाटे-पहाटे अस्ताव्यस्त परिस्थितीत बाहेर पडताना पाहिले आहे. हे असे अभिनेते होते, ज्यांना समाजात एक फॅमिली मॅन म्हणून आदराने पाहिले जाते, मान-सन्मान दिला जातो.' सोमीने कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे आता नेमके हे कोणते कलाकार आहेत असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
यापूर्वी एका मल्याळम अभिनेत्रीने व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे लावल्याचे सांगितले आहे. हेमा समितीने जाहिर केलेल्या अहवालानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन लैंगिक शोषणावर वक्तव्य केले. हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेली प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरतकुमार यांनी देखील एक अनुभव सांगितला. त्यांनी शुटिंगच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या व्हिनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरा लावलेले असायचे असा खुलासा केला आहे. तसेच व्हॅनिटीमध्ये कपडे बदलत असताना अभिनेते त्या कॅमेराच्या माध्यमातून सर्व काही पाहात असायचे असे देखील म्हटले आहे.
वाचा: 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते', प्रसिद्ध रॅपरचा धक्कादायक खुलासा
"मी केरळमध्ये सेटवर असताना पाहिले की, लोक एकत्र जमले आहेत आणि काहीतरी पाहुन हसत आहेत. मी जवळ गेल्यावर मला दिसले की, ते व्हिडीओ पाहत आहेत. मी क्रू मेंबरला कॉल केला आणि त्याला विचारले की ते काय पाहत आहेत. मला सांगण्यात आले की व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे लावण्यात आले होते आणि त्यातून महिलांचे कपडे बदलतानाचे फुटेज घेण्यात आले होते. मला सांगण्यात आले की तुम्ही फक्त कलाकारांचे नाव टाइप केल्यास तुम्हाला त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ मिळतील" असे राधिका नमस्ते केरळला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.