गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान असल्याचे म्हटले जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला बिश्नोई गँगच्या धमक्या वारंवार येत आहेत. आता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने सलमानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमानच्या वन नाईट स्टँडमुळे ती नाराज असल्याने तिने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे.
सलमान खानवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने आजवर अनेक अरोप केले आहेत. ही एक्स- गर्लफ्रेंड सोमी अलीने हे गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच्या वेळचे खुलासे केले आहेत. सोमी अलीने काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईला भेटण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली होती. नोव्हेंबर महिन्यात ती लॉरेन्स बिश्नोईला भेटणार असल्याचंही तिने म्हटलं होतं. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता तिने सलमानवर पुन्हा अनेक अरोप केले आहेत.
सोमी अलीने नुकताच आयएएनएसला या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, "मी खूप वर्षांआधी ॲक्टिंग करियर सोडलं आहे. मी अमेरिकेत माझ्या NGO चं काम करत आहे, जे खूप चांगल्याप्रकारे सुरु आहे. अमेरिकेत मी चांगलं काम केलं आहे. मी खूप काही कमावलं आहे, पण तरीही लोक मला सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड या नावाने ओळखतात."
वाचा: सनी लिओनीने केले दुसऱ्यांदा लग्न, मुलांच्या साक्षीने घेतली शेवटपर्यंत साथ निभावण्याची शपथ
सलमान खानच्या एक नव्हे तर आठ वन नाईट स्टँड्समुळे सोमी अलीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. "दररोज होणारा शारीरिक आणि मानसिक छळ मला सहन होत नव्हता. मी त्याच्या वन नाईट स्टँडमुळे दु:खी होते, म्हणून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि इंडस्ट्री सोडली" असे सोमी म्हणाली.