फसवणूक करणारे नेहमीच संधीच्या शोधात असतात. सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या सुपरस्टार्सच्या नावावर अनेक घोटाळे झाले आहेत, पण आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये बॉलिवूडच्या भाईजानच्या चाहत्यांना त्यांच्या शोची तिकिटे विकण्याच्या नावाखाली लुटले जात आहे. सलमान खान अनेकदा परदेशात आपले शो करत असतो आणि याचाच फायदा घेत काही स्कॅमर्सनी त्याच्या चाहत्यांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानच्या मॅनेजरने एक पोस्ट टाकून लोकांना याबाबत सतर्क केले आहे.
सोमवारी सलमान खानचे मॅनेजर जॉर्डी पटेल यांनी अमेरिकेत होणाऱ्या सलमान खानच्या शोची फेक पोस्ट शेअर करत लोकांना स्कॅमर्सच्या तावडीत न पडण्याचे आवाहन केले होते. संपूर्ण देशात सलमान खानचे चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. त्यामुळे सलमान खानच्या शोचे फेक तिकिट विकणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन मॅनेजरने केले आहे. त्यांनी याबाबत अधिकृत माहिती देखील दिली आहे.
जॉर्डी पटेल यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये एक तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म दावा करत आहे की सलमान खान अर्लिंग्टन थिएटरमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यात सलमान खानचा एक फोटो देखील दिसत आहे. तसेच फोटोमध्ये सलमान चाहत्यांना संबोधित करताना दिसत आहे. जॉर्डीने हा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, 'तिकीट खरेदी करू नका. २०२४ मध्ये सलमान खान अमेरिकेला कोणत्याही कार्यक्रमासाठी जाणार नाही.' सध्या सोशल मीडियावर जॉर्डी यांनी शेअर केलेला स्क्रीनशॉट तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत अशा प्रकारचे स्कॅम करणाऱ्यांना शिक्षा द्यायला हवी असे देखील म्हटले आहे.
वाचा : इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
सध्या मुंबईतील आपल्या घरी आहे. नुकताच त्याने मलायका अरोराच्या घरी हजेरी लावली. मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी घराच्या बाल्कनीमधून उडी मारुन आत्महत्या केली. या दु:खद काळात मलायकाला साथ देण्यासाठी सलमान खान पोहोचला होता. सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर लवकरच त्याचा सिकंदर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याचा एक लूक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.