मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: जखमी 'पठाण'ला वाचवण्यासाठी टायगरची एण्ट्री, सलमानचा चित्रपटातील कॅमिओ लीक
पठाण
पठाण (HT)

Pathaan: जखमी 'पठाण'ला वाचवण्यासाठी टायगरची एण्ट्री, सलमानचा चित्रपटातील कॅमिओ लीक

25 January 2023, 13:02 ISTAarti Vilas Borade

Salman Khan: पठाण या चित्रपटाल बॉलिवूडचा किंग खान आणि दबंग खान यांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी आहे.

बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांना एकत्र पाहण्यासाठी नेहमी चाहते उत्सुक असतात. आता चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट आज २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रटात सलमान खान ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. किंग खान आणि दबंग खानला पठाणमध्ये एकत्र पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी आहे. आता चित्रपटातील त्यांचा सीन लीक झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर 'पठाण' चित्रपटातील एक क्लिप लीक झाली आहे. या व्हिडीओमध्ये पठाण आणि टायगरचा अॅक्शन सीन आहे. या सीनमध्ये पठाण जखमी झालेला असतो. त्याला शत्रूने घेरलेले असते. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र टायगर तेथे पोहोचतो असा सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पहिल्यांदाच शाहरुख आणि सलमानने एकत्र अॅक्शन सीन दिला आहे.
वाचा: बेशरम रंग गाण्यावर दीपिकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'डान्स करताना आम्ही...'

पठाण आणि टायगर यांचा हा एकत्र सीन चाहत्यांसाठी पर्वणी आहे. या दोघांना एकत्र पाहाताना लोकं थिएटरमध्ये शिट्यांचा आणि टाळ्यांचा कडकडात करताना दिसत आहेत. चाहत्यांची दुसरी आनंदाची बातमी म्हणजे सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळे चाहते देखील आतुर झाले होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून या चित्रपटाच्या शोला सुरुवात झाली आहे. सध्या सगळीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करणार आहे. चित्रपटाच्या कथानकासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

विभाग