बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या लग्नाला काही महिने झाले आहेत. लग्नाआधी दोघांनी आपले नाते सर्वांच्या नजरेपासून लपवून ठेवले होते, पण आता लग्नानंतर दोघंही आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलत आहेत. सोनाक्षीला कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध असल्याचे म्हटले जात आहे. पण जेव्हा सलमान खानला याविषयी कळाले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि जहीर खान यांनी इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये हजेरी लावली. या शोचे अभिनेता जय भानूशाली सूत्रसंचालन करताना दिसत आहे. जयने सोनाक्षी आणि जहीरला तुम्हाला भेटवण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा कोणाच्या माध्यमातून तुमची भेट झाली? असा प्रश्न विचारला. यावर झहीरने सलमान खानचे नाव घेतले. जाणून घ्या सलमानने दोघांना भेटण्यासाठी कशी मदत केली.
जहीरने जयच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटले की, 'त्याने मला बोलावले आणि म्हणाला तूपण माझे कुटुंब आहेस आणि ती पण.. त्यामुळे नेमकं काय चाललं आहे मला सांग... नाही.. माझ्या मनात खऱ्या भावना आहेत. आमचे एकमेकांवर प्रेम आहे... पण आम्ही त्यावेळी कोणत्या एका पॉईंटपर्यंत पोहोचलो नव्हतो.. आम्ही एकमेकांना डेट करत नव्हतो. पण सलमानने नोटीस केले होते की आम्ही सतत कोपऱ्याकोपऱ्यात जाऊन बोलत आहोत. बराच वेळ एकमेकांशी बोलत आहोत.'
दुसऱ्या एका कार्यक्रमात सोनाक्षीला तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. तिने इतकी वर्षे त्याचे नाते सर्वांपासून लपवून का ठेवले होते. त्यावर अभिनेत्रीने, 'नजर... खाजगी गोष्टी खाजगी ठेवायला हव्यात असे मला वाटते. तू आधीच खूप लाइमलाइटमध्ये आहेस. तुमच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. आपल्या जवळच्या गोष्टी स्वत:पुरत्या ठेवल्या पाहिजेत. आम्ही भेटलो, प्रेमात पडलो. मला पटकन कळले की हे कायमस्वरूपी आहे. पण त्याच्याकडून उशीर झाला' असे उत्तर दिले.
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…
झहीर पुढे म्हणा ला होता की, ' सुरुवातीच्या काळात मला वाटलं होतं की हे सगळं नवीन आहे म्हणून घडलं. मला पहिल्या दिवसापासून माहित होते की हे असे आहे, परंतु मी थोड्या वेळाने ते स्वीकारले. '