बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंग जॉली उर्फ शेराला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. तो नेहमीच सलमान खानसोबत त्याच्या सावलीसारखा असतो. एअरपोर्ट असो किंवा दुसऱ्या सेलेबच्या घरी होणारी पार्टी, शेरा नेहमीच सलमान खानच्या सुरक्षेत तैनात असतो. पण सध्या सगळीकडे शेरा आणि सलमानशिवाय शेराच्या मुलाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर शेराच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शेराच्या मुलाचे नाव अबीर सिंग असे आहे. खरं तर तो आदल्या दिवशी वडील शेरा आणि अभिनेता सलमान खानसोबत दिवाळी पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. दिवाळी पार्टीदरम्यान शेरा आणि त्याचा मुलगा अबीर यांनी फोटोग्राफर्सला पोझ दिल्या. दरम्यान, शेराने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली आहे. तर शेराचा मुलगा अबीरने फ्लोरल कुर्ता परिधान केला आहे. पण अबीरने दाढी वाढवल्यामुळे तो वडिलांपेक्षाही जास्त वय असल्यासारखा वाटत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेरा आणि अबीरचा लूक पाहून लोक कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडत आहेत. एका युजरने लिहिले की, 'शेराचा मुलगा, शेराचे वडील होताना दिसत आहे.' तर दुसऱ्या एका यूजरने, 'बाबा (शेरा) मुलापेक्षा (अबीर) हुशार दिसत आहेत अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने "शेराकडे बघून त्याला एवढा मोठा मुलगा आहे असं वाटत नाही' असे म्हटले आहे. सध्या सगळीकडे शेरा आणि त्याच्या मुलाची चर्चा रंगली आहे.
वाचा: 'या' भाजपच्या महिला खासदाराने साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका
अबीर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे 12,800 फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान लवकरच शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. अबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने सलमान खान आणि अनुष्का शर्माच्या 'सुलतान' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आता त्याच्या आगामी सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
संबंधित बातम्या