एका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान खानला घालावे लागले होते ५-६ लेडीज लेगिंग्ज! वाचा भन्नाट किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान खानला घालावे लागले होते ५-६ लेडीज लेगिंग्ज! वाचा भन्नाट किस्सा

एका गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान खानला घालावे लागले होते ५-६ लेडीज लेगिंग्ज! वाचा भन्नाट किस्सा

Dec 27, 2024 08:54 AM IST

Salman Khan Birthday : एका गाण्यादरम्यान सलमान खान याला मुलींचे लेगिंग घालावे लागले होते, हा किस्सा तुम्ही ऐकलात का?

Salman Khan
Salman Khan

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा 'दबंग' म्हणवल्या जाणाऱ्या सलमान खानसाठी इंडस्ट्रीचा 'भाईजान' बनणे सोपे नव्हते. करिअरच्या या प्रवासात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचे वडील सलीम खान हे प्रसिद्ध लेखक आहेत, पण तरीही वडिलांच्या मदतीशिवाय सलमान खानने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता की लोक त्याला तो बारीक दिसतो, असे म्हणत नाकारायचे. 'मैने प्यार किया' या चित्रपटातून या अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.

सलमान खानच्या जीवनाशी निगडित अनेक किस्से आहेत, ज्यांची बरीच चर्चा झाली आहे. आज आम्ही तुम्हाला यापैकीच एक भन्नाट किस्सा सांगणार आहोत. आजवर आपल्या पात्रासाठी कलाकारांनी अनेक गोष्टी केल्याचे तुमच्या ऐकिवात असेल. पण, एका गाण्यादरम्यान सलमान खान याला मुलींचे लेगिंग घालावे लागले होते, हा किस्सा तुम्ही ऐकलात का? सलमान खान आज ५९ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी इंदूर येथे झाला. त्याचे वडील सलीम खान आणि आई सलमा (सुशीला चरक). सलमान तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

दिले दमदार चित्रपट

सलमान खानने'बीवी हो तो ऐसी'मधून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता, ज्यामध्ये तो एका सहाय्यक भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट १९८८मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्याने 'मैने प्यार किया'मधून मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. हिट झाल्यानंतर, अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि 'हम साथ साथ है', 'हम आपके है कौन', 'बीवी नंबर १' आणि 'दबंग' सारख्या चित्रपटांमधून आपली अभिनय क्षमता सिद्ध केली.

'या' चित्रपटात सलमान खान बनला होता रेखाचा दीर, केली होती सिनेमा फ्लॉप होण्यासाठी प्रार्थना

गाण्याचे शूटिंग सुरू होते अन्...

सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असला तरी, त्याच्या आयुष्यात वादही कमी झाले नाहीत. त्याच्या पदार्पणाच्या काळात एक अशी घटना घडली, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. 'मैने प्यार किया'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला मुलींचे लेगिंग घालावे लागले होते. ही घटना त्यावेळची आहे, जेव्हा या चित्रपटासाठी 'कबूतर जा जा' गाणे शूट केले जात होते. या गाण्यात सलमानने ग्रे कलरची सूट पँट घातली आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान, दिग्दर्शक सूरज बडजात्याने अॅक्शन म्हणताच सलमान या गाण्यावर नृत्य करू लागला होता. पण, त्यावेळी दिग्दर्शकाने अचानक कट म्हटले. याचे कारण म्हणजे सेटवर जोरदार वारा वाहत होता आणि सलमान खानची पॅन्ट खूप ढगळी होती. यामुळे त्याचे पाय लाकडासारखे पातळ दिसत होते.

सलमानला घालावे लागले मुलींचे लेगिंग्ज

सलमान खान त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात खूप बारीक होता. 'मैने प्यार किया' गाण्याच्या शूटिंगदरम्यान जोरदार वारा वाहत होता आणि त्याची पॅन्ट त्याच्या पायाला सतत चिकटत होती. यामुळे त्याचे पाय खूप काटकुळे वाटत होते. अशावेळी दिग्दर्शक सूरज बडजात्याला एक कल्पना सुचली. त्याने सलमान खानला पँटखाली ६-७ मुलींच्या लेगिंग्ज घालायला लावल्या. जेणेकरून पँट पायाला चिकटली तरी, त्याचे पाय बारीक दिसणार नाहीत. यानंतर सलमान खानचे पाय जरा ठीक वाटू लागले आणि त्यांचे गाणे शूट झाले.

Whats_app_banner