मराठी बातम्या  /  Entertainment  /  Salman Khan And Shah Rukh Khan Eid Celebration 2023 Superstars Meet Fans

Eid Celebration: सलमानसोबत बॉडीगार्ड, तर शाहरुखसोबत अबराम; बॉलिवूडच्या ‘खान’दानाने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा!

Salman Khan and Shah Rukh Khan Eid Celebration
Salman Khan and Shah Rukh Khan Eid Celebration
Harshada Bhirvandekar • HT Marathi
Apr 23, 2023 09:41 AM IST

Salman Khan, Shah Rukh Khan Eid Celebration : ईदच्या जल्लोषात चाहत्यांच्या नजरा सलमान खानच्या ‘गॅलॅक्सी अपार्टमेंट’ आणि शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर खिळलेल्या असतात. या खास निमित्ताने बॉलिवूडचे दोन्ही कलाकार त्यांच्या चाहत्यांची भेट घेतात.

Salman Khan, Shah Rukh Khan Eid Celebration : जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला आहे. यानिमित्ताने बॉलिवूडच्या कलाकारांनी त्यांचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, ईदच्या जल्लोषात चाहत्यांच्या नजरा सलमान खानच्या ‘गॅलॅक्सी अपार्टमेंट’ आणि शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर खिळलेल्या असतात. या खास निमित्ताने बॉलिवूडचे दोन्ही कलाकार त्यांच्या चाहत्यांची भेट घेतात. यावर्षी देखील त्यांनी चाहत्यांचा हिरमोड केलेला नाही. यावेळी सलमान त्यांच्या बॉडीगार्ड्ससह बाल्कनीत आला होता. तर, शाहरुख खान अबरामसोबत ‘मन्नत’च्या व्ह्युव्हिग स्पॉटवर आला होता.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूड किंग शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय त्यांनी मन्नतबाहेर जमलेल्या चाहत्या वर्गालाही संबोधित केले आणि त्याच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी सलमान खान याने यावेळी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत ईद साजरी केली. तर, यावेळी चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षीप्रमाने याही वर्षी सलमान त्याच्या घराच्या बाल्कनीत आला होता. मात्र, सध्या त्याला मिळत असलेल्या धमक्या आणि अभिनेत्याची सुरक्षा लक्षात घेऊन अधिकचे बॉडीगार्डदेखील भाईजानसोबत होते.

KKBKKJ Review: अ‍ॅक्शन, फॅमिली ड्रामाला कॉमेडीचा तडका; कसा आहे सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’?

सलमान खानने आपल्या घरातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तो हात हलवून घराबाहेर उभ्या असलेल्या प्रचंड चाहता वर्गाला शुभेच्छा देताना दिसत आहे. ईदनिमित्त सलमानच्या घराबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढणे देखील महत्त्वाचे होते. यावेळी त्याने हात उंचावून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हे फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'तुम्हा सर्वांना ईद मुबारक'.

प्रत्येक मोठ्या सणाला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शाहरुख देखील मन्नतच्या बाहेर येतो. ईदच्या निमित्ताने देखील सकाळपासूनच ‘मन्नत’च्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. चाहत्यांना त्याला एकदा बघायचे होते. तर, शाहरुखनेही आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. यावेळी शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या टी-शर्टसोबत काळ्या रंगाची डेनिम परिधान केली होती. शाहरुख खानसोबत अबरामही बाल्कनीत आला होता. अबरामने ईदला पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. ‘मन्नत’च्या बाहेर एवढी गर्दी जमली होती की, पोलीसही घटनास्थळी हजर होते.

WhatsApp channel