Salim Khan On Salman Khan Wedding : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे फॅन्स पसरले आहे. या सगळ्यांनाच वर्षानुवर्षे एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे भाईजान लग्न कधी करणार? सलमान आता ५९ वर्षांचा होणार आहे. साठीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला सलमान खान अजूनही सिंगल आहे. आजवर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. मात्र, त्याचं कोणतही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. प्रत्येक वेळी संधी मिळताच चाहते सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारतात आणि प्रत्येक वेळी सुपरस्टार आपले शब्द फिरवून उत्तरे देतो. मात्र, हा प्रश्न सलमान खानचे वडील सलीम खान यांना विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.
कोमल नाहता ‘और एक कहानी’च्या जुन्या एपिसोडमध्ये सलीम खान यांना विचारण्यात आले की, सलमान खान लग्न कधी करणार? ज्येष्ठ लेखकाने उत्तर दिले की, लग्नासाठी तुम्हाला दोन लोकांची गरज आहे. एक मुलगी आणि सलमान. सलीमजी गमतीने म्हणाले की, ‘अनेक वेळा मी जवळजवळ अंदाज बांधून चुकलो आहे. आता सवय झाली आहे’, असे तो म्हणाला.
सलमानच्या लग्नाबाबत आत्मविश्वासाने सलीम खान पुढे म्हणाले की, सलमान जेव्हा त्याच्या नशिबात असेल तेव्हाच लग्न करेल. लग्न न करण्यामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सलीम खान यांनी हेही कबूल केले की, ते असे म्हणू शकत नाही की, त्यांच्या मुलाचे करिअर अद्याप सेट झालेले नाही आणि तो लग्नासाठी खूप लहान आहे. सलमानच्या लग्नाबाबत त्यांच्याकडे कोणतेही ठोस उत्तर किंवा निमित्त नाही.
जेव्हा सलीम खान यांना पुढे विचारण्यात आले की, तुम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाची चिंता आहे का? यावर उत्तर देताना सलीम खान म्हणाले की, ‘आता काही टेन्शन राहिलेले नाही, आता या टेन्शनची सवय झाली आहे, आम्ही यासाठी तयारच झालो आहोत.’ सलीम जी पुढे म्हणाले की, आता सलमानच्या आईलाही याची सवय झाली आहे आणि तीही म्हणते की, जेव्हा हे व्हायला हवे, तेव्हा ते होईल. आपले बोलणे संपवताना ते शेवटी सलमानच्या लग्नावर म्हणाले की, जेव्हा तो लग्न करेल, तेव्हा मी कोट आणि टाय घालून लग्नात जाईन.