Angry Young Men review: सिनेसृष्टीचे सत्य सांगत सलीम-जावेद यांनी सांगितली आपली कथा-salim khan and javed akhtar angry young men series review ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Angry Young Men review: सिनेसृष्टीचे सत्य सांगत सलीम-जावेद यांनी सांगितली आपली कथा

Angry Young Men review: सिनेसृष्टीचे सत्य सांगत सलीम-जावेद यांनी सांगितली आपली कथा

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 20, 2024 05:14 PM IST

Angry Young Men review: सलीम खान आणि जावेद अख्तर यांची डॉक्यु सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये दोघांच्या प्रोफेशनल लाईफची कहाणी दाखवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ही सीरिज नेमकी कशी आहे...

Angry Young Men review
Angry Young Men review

सत्तरच्या दशकात ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’ यासारखे एकापाठोपाठ एक सुपरहिट बॉलिवूड चित्रपट लिहिणारी जोडी म्हणजे सलीम खान आणि जावेद अख्तर. या जोडीची अँग्री यंग मॅन ही डॉक्यु सीरिज प्रदर्शित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सीरिजची सर्वजण वाट पाहात होते. कारण अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा एकत्र लिहिणाऱ्या २ लेखकांची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तुम्हीही विचार करत असाल की या सीरिजमध्ये नेमकं काय दाखवण्यात आले आहे. चला जाणून घेऊया या सीरिजचा रिव्ह्यू...

सीरिजचा रिव्ह्यू

अँग्री यंग मॅन या डॉक्युसीरिजची सुरुवात चांगली होते. सुरुवातीला आमिर खानपासून रणवीर सिंग, हृतिक रोशन, करण जोहर आणि अनेक बॉलिवूड स्टार्स सलीम-जावेदच्या कामाबद्दल बोलताना उत्साही दिसतात. पटकथालेखक होण्याचा विचारही नसतानाही इंडस्ट्रीबाहेरील या दोघांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश कसा केला, याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचा संघर्ष, मुंबईत आल्यावर आलेल्या अडचणी, त्यांच्या मनात असलेली भीती आणि अपेक्षा या सगळ्या गोष्टींमुळेच तर अँग्री यंग मॅनचा जन्म होतो.

काही मनोरंजक किस्से

या सीरिजमध्ये जंजीर चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन हे पात्र कसे उभे केले आणि ते लिहितानाचा उत्साह दाखवण्यात आला आहे. सलीम-जावेद जोडीने मध्यमवर्गीयांची अधीरता, बंडखोरी आणि साधी चिंता यांचा कसा फायदा उठवला, याची आठवणही शबाना आझमी यांनी करून दिली. भ्रष्ट व्यवस्थेवर नाराज असलेल्या लोकांवर या चित्रपटांतील व्यक्तिरेखांचा थेट प्रभाव पडला. या मालिकेचा सर्वात मनोरंजक भाग म्हणजे जेव्हा दोन्ही पटकथालेखक त्यांच्या बालपणाबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोलतात. दिग्दर्शिका नम्रता राव यांनी अतिशय संवेदनशीलतेने आणि आदराने ते दाखवून दिले आहे. या सीनची जागा अतिशय सुंदर आहे. जसे की दोन डोंगरांवर नदी वाहत आहे. याच काळात, १९७५मध्ये शोले आणि दीवार हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी हिंदी सिनेमांची दिशा बदलली.
वाचा: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा

लेखकांचा संघर्ष

सलीम-जावेद यांच्या कथा जितक्या रंजक आहेत तितकाच त्यांचा संघर्ष मोठा होता. वरुण ग्रोव्हर, जयदीप साहनी आणि जुही चतुर्वेदी यांच्यासारख्या पटकथालेखकांनीही इंडस्ट्रीत लेखकांना कशी वागणूक दिली जाते हे सांगितले आहे. या दोन्ही लेखकांनी एकट्याने गेल्यानंतर आपल्या कारकिर्दीला कसे आकार दिले, ही या माहितीपटाची खरी न सांगितली जाणारी कहाणी असू शकते. अँग्री यंग मेन ही सलीम-जावेद या दोन माणसांनी भारतीय चित्रपटसृष्टी घडवण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा आहे. चाहत्यांसाठी ही एक वेगळी भेट आहे.

विभाग