Salaar Trailer Twitter Reaction: साऊथ स्टार प्रभास याचा 'सालार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सालार'च्या ट्रेलरमध्ये 'डार्लिंग' प्रभासचा ढाँसू अवतार पाहून चाहते या चित्रपटासाठी आतुर झाले आहेत. प्रभासचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता 'सालार'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रभासच्या चाहत्यांना हा ट्रेलर खूपच आवडला आहे. सालारच्या ट्रेलरमध्ये प्रभासची अॅक्शन स्टाईल सर्वांची मनं जिंकून घेत आहे. त्यामुळेच चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटासोबत 'सालार' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बऱ्याच चर्चा आणि दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर प्रभासच्या 'सालार: पार्ट १ सीझफायर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे 'सालार'च्या ट्रेलरमध्ये प्रभासचा धमाल अवतार पाहायला मिळाला आहे. ट्रेलर पाहूनच अंदाज येत आहे की, हा चित्रपट पडद्यावर अॅक्शन आणि थ्रिलचा डबल डोस देणार आहे. 'सालार'च्या ३ मिनिटे ४७ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये प्रभासची दमदार अॅक्शन सर्वांची मनं जिंकून घेत आहे. अभिनेता प्रभास गेल्या काही काळापासून एका हिट चित्रपटाची वाट पाहत आहे.
आता प्रभासला 'केजीएफ'सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या प्रशांत नीलकडून खूप अपेक्षा आहेत. होमबेल्स फिल्म्स निर्मित 'सालार: पार्ट १ सीझफायर' चित्रपट निर्माता प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 'सालार'मध्ये सर्व कलाकार आपापल्या शैलीत धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहेत. 'सालार: पार्ट १ सीझफायर' हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.