'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

Aarti Vilas Borade HT Marathi
May 12, 2024 08:36 AM IST

सखी गोखले ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची मुलगी आहे. नुकताच सखीने वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

सखी गोखले वडिलांविषयी स्पष्ट बोलली
सखी गोखले वडिलांविषयी स्पष्ट बोलली

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोहन गोखले हे नाव अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची लेक सखी गोखलेने देखील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. मोहन गोखले यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी शुभांगी गोखलेने आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका बजावत सखीचा सांभाळ केला. अनेकदा दोघीही त्यांच्या नात्याविषयी बोलताना दिसतात. नुकताच सखीने केलेले व्यक्तव्य चर्चेत आहे.

सखीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वडील मोहन गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला. जेव्हा सखी सहा वर्षांची होती तेव्हा मोहन गोखले यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यावेळी सखी अगदीच लहान होती, त्यामुळे वडिलांसोबतच्या काही आठवणी नसल्याचे सखी नेहमीच सांगते आली आहे. पण यावेळी तिने तिचे वडील लवकरच गेले ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली झाल्याचे म्हटले आहे.
वाचा: प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

सखीने मांडले स्पष्ट मत

सखीला मुलाखतीमध्ये 'आई सोबतच आहे. पण कधी वडिलांची उणीव जाणवते का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सखीने, 'मी हे यापूर्वीही म्हटले होते की, हे ऐकायलाही क्रूर वाटते, पण मी खूपच नशिबवान आहे की माझा बाबा मी खूप लहान असताना गेला. म्हणजे मी इतकी लहान होते की माझ्याकडे त्याच्या काही आठवणी नाहीयेत. कारण जसे जसे तुम्ही मोठे होतात, तशा तुमच्या आठवणी खूप स्ट्राँग होत जातात. तुम्ही बाबाच्या जवळ आहात की आईच्या हेही मला तेव्हा कळत नव्हते. पण तो असेपर्यंतही तो इतकं काम करत होता की आईच तेव्हा कायम माझ्याबरोबर असायची. जे लोकं कळत्या वयात त्यांच्या आईवडिलांना गमावतात, त्यांच्यासाठी खूपच कठिण होऊन बसतं. पण माझा बाबा अशा वेळी गेला जेव्हा मला काहीच कळत नव्हते. त्यामुळे मला बाबा असणे काय असते हेच कधी माहित नाही आणि ही खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे' असे स्पष्ट उत्तर दिले.
वाचा: विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

शुभांगी गोखलेने व्यक्त केल्या भावना

सखीचे बोलणे झाल्यावर शुभांगी गोखले यांनी देखील वक्तव्य केले. 'मला कधी कधी वाटते की सखीसाठी मोहन हवा होता. मोहनला क्रिकेट असो राजकारण असो सगळ्या गोष्टी मुखोद्गत असायच्या. मोहनकडून तिला या गोष्टी कानावर पडायला हव्या होत्या. मोहनच्या नजरेतून तिला जग पाहायला मिळायला हवे होते. मी तिला सतत फिरवते. जितके तिला फिरवता येईल तितके मी तिला फिरवते. पण मोहनच्या नजरेतून होणारा प्रवास हा मी खूप मिस करते' असे शुभांगी म्हणाल्या.
वाचा: “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Whats_app_banner