अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी हे मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल आहेत. ते दोघेही काही मोजक्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या प्रोजेक्टविषयी उत्सुकता पाहायला मिळते. त्यांचे 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक गाजले होते. त्यानंतर आता त्यांचे आता नवे नाटक येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी ताणली आहे.
हल्लीची पिढी त्यांच्या गोष्टी आणि यातून घडणारी गंमत दाखवण्यासाठी सखी सुव्रत एक नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार आहेत. अमर फोटो स्टुडिओनंतर हे दोघे पुन्हा एकदा या नाटकात एकत्र काम करणार असून या नाटकाची गोष्ट देखील तितकीच खास आहे. "वरवरचे वधू वर" अस या नाटकाचे नाव असून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.
सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केल्यानंतर ही जोडी "अमर फोटो स्टुडिओ" या नाटकामध्ये दिसली होती आणि आता पुन्हा सखी सुव्रत नव्या नाटकासाठी एकत्र येणार आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विराजस कुलकर्णीने केले आहे. सखी आणि सुव्रतने सोशल मीडियावर या बद्दलची पोस्ट शेअर करून ही खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली.
सखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमझ्ये सखी आणि सुव्रत भांडताना दिसत आहेत. त्यांच्या संसारात सतत भांडणे होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या सोशल मीडियावर सखीने शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सखीने, 'आमचे नवे नाटक... जोडीदार शोधणारे मादी आणि नर, वर्षानुवर्षे ज्यांनी थाटले आहे घर, आशिर्वादासाठी ज्यांचे हवेत आहेत कर, मुलांच्या काळजीने ज्यांना लागली आहे घरघर, अश्या सगळ्यांना हवे आहे मनोरंजन जर, नवे आमचे नाटक वरवरचे वधू-वर बिन प्रेमाची लव्हस्टोरी लवकरच रंगभूमीवर' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: 'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर सध्या सखी आणि सुव्रतच्या या नव्या नाटकाची चर्चा रंगली आहे. अनेकांनी या नाटकाचा प्रोमो पाहून "वरवरचे वधू-वर बिन प्रेमाची लव स्टोरी" नाटकामध्ये नक्की काय पाहायला मिळणार? सखी आणि सुव्रतसोबत आणखी कोणते कलाकार असणार? असे अनेक प्रश्न पडले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळतील असे देखील सखीने सांगितले आहे. प्रेक्षक या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि सखी सुव्रत यांची ही बिन प्रेमाची भानगड नक्की काय असणार हे अनुभवण्यासाठी आतुर आहेत.
संबंधित बातम्या