Sajan Ghar Aao Re Song: सैनिकांच्या पत्नींना समर्पित ‘सजन घर आओ रे’; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत!-sajan ghar aao re song out bigg boss fame actress lokesh kumari sharma in lead role must watch video ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sajan Ghar Aao Re Song: सैनिकांच्या पत्नींना समर्पित ‘सजन घर आओ रे’; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत!

Sajan Ghar Aao Re Song: सैनिकांच्या पत्नींना समर्पित ‘सजन घर आओ रे’; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत!

Mar 17, 2024 04:06 PM IST

Sajan Ghar Aao Re Song Out: सैनिक आपल्या कुटुंबाआधी देशाच्या संरक्षणाचा विचार करतात. अशाच सैनिकांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या भावना दर्शवणारं एक नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

सैनिक पत्नींना समर्पित ‘सजन घर आओ रे’ गाणं
सैनिक पत्नींना समर्पित ‘सजन घर आओ रे’ गाणं

Sajan Ghar Aao Re Song Out: देशसेवेसाठी भारतीय जवान नेहमी तत्पर असतात. कधी रक्त गोठवणाऱ्या थंडीत तर, कधी घनदाट जंगलात ते वर्षानुवर्षे तैनात असतात. सैनिक आपल्या कुटुंबाआधी देशाच्या संरक्षणाचा विचार करतात. अशाच सैनिकांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या भावना दर्शवणारं एक नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मधुसदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी निर्मित ‘सजन घर आओ रे’ हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोकेश कुमारी शर्मा आणि अभिनेता रूफी खान यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली आहे.

सैनिक पत्नींच्या भावना व्यक्त करणारं हे गाणं प्रसिद्ध गायिका अन्वेशा हीने आपल्या सुमधुर आवाजात गायलं आहे. तर, गाण्याचे बोल समिर सामंत यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे संगीत प्रसाद फाटक यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे गाणं काश्मीर येथे चित्रीत करण्यात आले आहे.

Viral Video: ढोल-नगाडे अन् धमाल… ‘असं’ झालं क्रिती खरबंदाचं सासरी स्वागत! व्हिडीओनं जिंकलं चाहत्यांचं मन

या गाण्याविषयी बोलताना निर्माते श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले की, ‘बऱ्याचदा कामानिमित्त काश्मीरला जाणं व्हायचं. तिथे आर्मीमध्ये असलेल्या काही जवानांची भेट झाली. त्यात काही तरूण आर्मी जवान होते, त्यांचं नुकतचं लग्न झालं होतं. काहींना लग्नानंतर दोन तीन वर्ष घरी जाताचं आलं नाही. त्यांचे अनुभव ऐकून अक्षरश: अंगावर शहारे आले. ते कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत असतात आणि त्यांच्या पत्नी कुटुंब सांभाळत असतात. दोघंही आपलं आयुष्य समर्पित करून आपली कर्तव्य बजावत असतात. याची जाणीव मला झाली. त्याच दरम्यान माझी संगीतकार प्रसाद फाटक यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला या गाण्याची कल्पना सुचवली. मला ही ते गाणं आवडलं. पुढे दिग्दर्शक शहनवाझ बकल यांनी ही कथा लिहिली आणि आम्ही हे गाणं काश्मिर व्हॅलीत चित्रीत करण्याचा निर्णय घेतला.’

पुढे ते म्हणाले की, ‘काश्मीरला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. काश्मीरला आपल्या भारताची सीमा देखील आहे. यातील दोन्हीही कलाकार मुळचे काश्मीरचेच आहेत. काश्मीरमधली माणसं फार चांगली आहेत. या गाण्याची खासीयत म्हणजे या गाण्याचा संपूर्ण क्रू देखील तिथलाचं आहे. गाण्यातला एक सिन अंधारात चित्रीत करताना, तेथील तापमान -१० होतं. अभिनेत्री लोकेश कुमारीने -१० तापमानात नृत्य सादर केलं आहे. इतक्या रक्तगोठवणाऱ्या थंडीत तिने त्याचं वेशभूषेत चेहऱ्यावरील योग्य हावभाव ठेवून, सगळे सीन चित्रीत केले. त्यामुळे तिचं विशेष कौतुक आहे. यावेळी संपूर्ण टीमसुद्धा त्यांच्यासोबत तिथे होती. त्यामुळे गाण्याच्या टीमचे ही विशेष कौतुक.’

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय’वर संतापले प्रेक्षक! अरुंधती म्हणते ‘इतकी नकारात्मक प्रतिक्रिया...’

गाण्याविषयी बोलताना श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले की, ‘जेव्हा हे गाणं आम्ही तिथल्या आर्मी कुटुंबाला दाखवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अचानक अश्रू आले. त्यांनी आमचे आभार मनात म्हटले की, तुम्ही या विषयावर विचार करून, अगदी समर्पक गाणं बनवलंत. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकताच मनाला एक वेगळचं समाधान मिळालं. आणि केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. देशरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आर्मी जवानांच्या पत्नींना मी हे गाणं समर्पित करतो.’

Whats_app_banner