मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुपरवायझर म्हणून काम करणारा साईनाथ माने झाला सिनेमॅटोग्राफर! ‘अ व्हॅलेंटाईन डे’चा किस्सा सांगताना म्हणाला...

सुपरवायझर म्हणून काम करणारा साईनाथ माने झाला सिनेमॅटोग्राफर! ‘अ व्हॅलेंटाईन डे’चा किस्सा सांगताना म्हणाला...

Jun 18, 2024 03:27 PM IST

साईनाथ मानेच्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

सुपरवायझर म्हणून काम करणारा साईनाथ माने झाला सिनेमॅटोग्राफर!
सुपरवायझर म्हणून काम करणारा साईनाथ माने झाला सिनेमॅटोग्राफर!

मराठी मनोरंजन विश्वात एका आगळ्यावेगळ्या विषयावरचा ‘अ व्हॅलेंटाईन डे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. तसेच रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगांवकर ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून मराठी चित्रपट सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर चक्क ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित करण्यात आलं होतं. शिवाय ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.

सायली अर्जुनच्या अडचणी वाढणार! प्रियाच्या हाती लागणार मोठं गुपित; ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

कसा सुरू झाला प्रवास?

चित्रपटाच्या चित्रीकरणाचा किस्सा सिनेमॅटोग्राफर साईनाथ सांगतो, ‘मी फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफर संचालक आहे. महिंद्रा कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करून, मुंबईत मी माझ्या करिअरची सुरुवात केली. माझा सिनेमॅटोग्राफीचा प्रवास सुरू झाला, जेव्हा एक मित्र मला मुंबईच्या बसरा स्टुडिओमध्ये घेऊन गेला. तिथे टीव्ही मालिका बनत होत्या. नोकरी करत असतानाच माझी सिनेमॅटोग्राफीची आवड वाढत गेली. याच आवडीने मी अहमदनगरला चित्रपटसृष्टीच शिक्षण घेतले. माझ्या प्रशिक्षणानंतर, मी अनेक लघुपट आणि माहितीपट शूट केले आणि मी दिग्दर्शित केलेल्या ‘चित्तर’ नावाच्या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार जिंकला. तसेच ‘लक्षुमी’ या लघुपटासाठी ३ वेळा सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळाला आहे.’

ट्रेंडिंग न्यूज

कशी मिळाली नवी संधी?

पुढे तो सांगतो, ‘पुणे येथे काम करण्याची संधी मिळाल्यानंतर, मी असंख्य अल्बम गाणी, माहितीपट आणि जाहिरात चित्रपटांवर काम केले. मला फिल्म शूटिंगसाठी ब्रेक मिळाला जेव्हा मी ‘आमोरे’ नावाच्या मराठी चित्रपटात डीओपी म्हणून काम केले आणि अजित पाटील यांनी दिग्दर्शनाचे काम केले. हा माझा पहिला मोठा प्रकल्प होता आणि तो यशस्वीपणे पूर्ण झाला. ‘आमोरे’च्या यशानंतर अजित पाटील यांनी मला ‘अ व्हॅलेंटाईन डे’ या चित्रपटासाठी आणखी एक महत्त्वाची संधी दिली. कथा ऐकल्यानंतर, मला माहित होते की शूटिंग आव्हानात्मक असेल. विविध ठिकाणी काम करणे आवश्यक आहे. पण, क्रिएटिव्ह दिग्दर्शक अजित पाटील आणि चित्रपटाचे निर्माते फैरोज माजगावकर दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आम्ही सर्वानी मिळून बरेच आव्हाने असूनही, हा चित्रपट यशस्वीपणे पूर्ण केला, आणि हा चित्रपट महाराष्ट्रात ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे.’

WhatsApp channel