मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सैफ अली खान ते गोविंदा; 'या' पुरुष कलाकारांनी ऑनस्क्रीन साकारलीये स्त्री भूमिका

सैफ अली खान ते गोविंदा; 'या' पुरुष कलाकारांनी ऑनस्क्रीन साकारलीये स्त्री भूमिका

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 24, 2022 03:38 PM IST

Bollywood actors played role of women: पडद्यावर स्त्री भूमिका साकारणं ही एक महत्वाची जबाबदारी असते. हे आव्हान अनेक बॉलिवूड कलाकारांनी घेतलं. पण काहींनी ते लिलया पेललं तर काहींना प्रेक्षकांनी नाकारलं

पडद्यावर स्त्री भूमिका साकारणारे कलाकार
पडद्यावर स्त्री भूमिका साकारणारे कलाकार

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या 'हड्डी' चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात नवाजुद्दीनने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. मात्र यापूर्वी असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्त्री भूमिका साकारण्याचं आव्हान लिलया पेललं. पाहा अशा कलाकारांची यादी.

आयुष्मान खुराना

आयुष्मान खुराना

आयुष्मान खुराना : प्रेक्षक आयुष्मान खुरानाच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या चित्रपटांमधून सामाजिक संदेश देणारा आणि भरपूर मनोरंजन करणाऱ्या आयुष्मानने 'ड्रीम गर्ल' या चित्रपटात मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो पूजाच्या भूमिकेत मन जिंकताना दिसला होता. मुलीच्या गेटअपमध्ये त्याचे सीन्स फार कमी होते.

गोविंदा

गोविंदा

गोविंदा : ९० च्या दशकात गोविंदाचं नाणं खणखणीवाजायचं. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो मनांवर राज्य केलं आहे. गोविंदा एक उत्तम अभिनेता आहे आणि तोही पडद्यावर मुलगी बनला आहे. 'आंटी नंबर वन' या चित्रपटात गोविंदाने एका महिलेची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

कमल हसन

कमल हसन

कमल हसन: पॅन इंडिया अभिनेता कमल हासनचा चित्रपट 'चाची ४२०' अजूनही प्रेक्षकांना आवडतो. हासनची भरपूर कॉमेडी आणि दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळाला. कमलचा चित्रपट 'चाची ४२०' अजूनही सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आहे.

अक्षय कुमार

अक्षय कुमार

अक्षय कुमार : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'खिलाडी' चित्रपटात मुलीची भूमिका साकारली होती. अक्षयने चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन करत प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडलं.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन: बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन हे देखील त्या स्टार्सपैकी एक आहेत ज्यांनी ऑनस्क्रीन स्त्रीची भूमिका साकारली आहे. 'लावारीस' चित्रपटातील 'मेरे अंगने में' या गाण्यात त्यांनी आपल्या स्टाईलने प्रेक्षकांची मने कशी जिंकली हे तुम्हाला नक्कीच आठवत असेल.

आमिर खान

आमिर खान

आमिर खान : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खानचाही या यादीत समावेश आहे. आमिरने 'बाजी' चित्रपटातील 'डोले डोले दिल' या गाण्यात प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. ज्यामध्ये तो एका मुलीच्या भूमिकेत होता. केवळ चित्रपटातच नाही तर गोदरेज, कोका कोला, टाटा स्काय यांसारख्या अनेक जाहिरातींमध्येही आमिर मुलगी बनला आहे.

रितेश देशमुख

रितेश देशमुख

रितेश देशमुख: अभिनेता रितेश देशमुखने रोमान्सपासून अॅक्शन आणि कॉमेडीपर्यंत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर रितेशही एका मुलीच्या रुपात मोठ्या पडद्यावर आला आहे. 'अपना सपना मनी मनी' आणि 'हमशकल्स' या चित्रपटात रितेशने एका मुलीची भूमिका साकारली आहे.

रितेश देशमुख

रितेश देशमुख

सैफ अली खान : सध्या 'विक्रम वेधा' या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानने ऑनस्क्रीन महिलेची भूमिकाही साकारली आहे. 'हमशकल्स' या चित्रपटात सैफ अली खानने एका महिलेची भूमिका साकारली होती.

IPL_Entry_Point